Anti-Corruption Bureau Sangli | 1 लाख 26 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी माळशिरसच्या मुख्याधिकाऱ्यावर अ‍ॅन्टी करप्शनकडून FIR

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  Anti-Corruption Bureau Sangli | रस्ते कामाचे बिल काढल्यानंतर ठेकेदाराला 1 लाख 26 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात सापडले आहेत. विश्वनाथ दिगंबरराव वडजे (Vishwanath Digambarrao Vadje) असं लाच मागितलेल्या मुख्याधिका-याचे नाव आहे. याप्रकरणी वडजे विरूध्द बुधवारी गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. ही कारवाई सांगली (Sangli) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau Sangli) केली आहे.

 

याबाबत माहिती अशी, माळशिरसमधील माऊली चौक ते कचरेवाडी हद्दीपर्यंतच्या रस्ता डांबरीकरणाचे काम सांगलीच्या एका ठेकेदाराने केले होते.
त्याच्या कामाचे बिल माळशिरस मुख्याधिकारी विश्वनाथ वडजे यांनी ठेकेदाराच्या बँक खात्यावर जमा केले होते.
बिल जमा केल्याच्या मोबदल्यात वडजे यांनी बिलाच्या 3 टक्के रक्कम लाच म्हणून मागितली.
यानंतर ठेकेदाराने 30 सप्टेंबर रोजी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti-Corruption Bureau Sangli) तक्रार केली होती.

 

दरम्यान, 22 ऑक्टोबर रोजी व 1 नोव्हेंबर रोजी वडजे यांच्याविरोधात एसीबी पथकाने सापळा रचला होता. याची कुणकुण वडजे यांना लागली होती.
त्यामुळे वडजे यांनी ठेकेदाराकडून लाच घेतली नाही. पण, लाच मागितल्याचे पडताळणीत स्पष्ट झाल्याने त्यांच्याविरूद्ध 17 नोव्हेंबर रोजी माळशिरस पोलिस ठाण्यात (Malshiras Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode) यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक सुजय घाटगे (DySp Sujay Ghatge) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुरूदत्त मोरे (PI Gurudatta More), अविनाश सागर (Avinash Sagar), संजय संकपाळ (Sanjay Sankapal), अजित पाटील (Ajit Patil), प्रितम चौगुले (Pritam Chowgule), संजय कलगुटगी (Sanjay Kalgutgi), चालक बाळासाहेब पवार (Driver Balasaheb Pawar) यांनी ही कारवाई केली.

 

Web Title : Anti-Corruption Bureau Sangli | bribe of rs 1 5 lakh demanded crime against malshiras chief Vishwanath Digambarrao Vadje

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Smriti Mandhana | स्मृती मंधानाने रचला इतिहास ! BBL मध्ये शतक करणारी ठरली पहिली भारतीय, 64 बॉलमध्ये नाबाद 114 रन

Anti Corruption Bureau Pune | 10 हजारांची लाच घेताना तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; बारामती तालुक्यातील घटना

Urmila Arjunwadkar | अभिमानास्पद ! जयसिंगपूरची कन्या झाली अमेरिकेत नगरसेविका