Anti Corruption Bureau Thane | 1500 रुपये लाच घेताना पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – जामीन मिळवण्यासाठी तपास अधिकाऱ्याचा (Investigating Officer) से आणून तो कोर्टात जमा करण्यासाठी दीड हजार रुपयाची लाच स्विकारताना (Accepting Bribe) वागळे इस्टेट पोलीस ठाण्यातील (Wagle Estate Police Station) पोलीस नाईक मिलिंद गणेश जोशी Milind Ganesh Joshi (वय-41) याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Thane) सापळा रचून अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि.27) दुपारी दीडच्या सुमारास करण्यात आली. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Thane) केलेल्या या कारवाईमुळे ठाणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार (वय-52) यांच्या मुलावर वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे. मुलाचा जामीन (Bail) करण्यासाठी तपास अधिकाऱ्याचा से आवश्यक असल्याने तक्रारदार यांनी कोर्ट कारकून (Court clerk) मिलिंद जोशी यांच्याकडे तपास अधिकाऱ्याचा से आणून कोर्टात जमा करण्यास सांगितले. त्यावेळी मिलिंद जोशी याने तक्रारदार यांच्याकडे दोन हजार रुपयांची लाच (Demanding Bribe) मागितली. तडजोडीमध्ये दीड हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau Thane) गुरुवारी (दि.23) तक्रार केली.

 

तक्रारदार यांनी केलेल्या लाचेची पडताळणी केली असता मिलिंद जोशी याने तपास अधिकाऱ्याकडून से घेऊन तो कोर्टात जमा करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. ठाणे एसीबीने (Thane ACB) आज (सोमवार) दुपारी सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना जोशीला रंगेहाथ पकडले

Web Title :- Anti Corruption Bureau Thane | Police personnel caught in anti-corruption bureau trap while accepting bribe of Rs 1500

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

BJP MLA Nitesh Rane | शिवसैनिकावर हल्ला प्रकरणी नितेश राणेंच्या अडचणीत वाढ; उद्या न्यायालयात सुनावणी

ST Workers Strike | संपकरी एसटी कामगारांना दणका ! मंत्री अनिल परब यांचं मोठं विधान

Property Tax Pune | पाच वर्षात पाणीपट्टी 100 टक्क्यांनी वाढली; परंतू पुणेकरांना अद्याप ‘चोवीस तास’ पाणी पुरवठा नाही; मिळकत करामध्ये 11 टक्के वाढीचा प्रशासनाचा प्रस्ताव

Pune Corporation | पुणे मनपाने मागीलवर्षीच्या उत्पन्नाचा आकडा यंदा डिसेंबरमध्येच गाठला ! मार्चअखेर पर्यंत 6500 कोटींचा टप्पा पार होईल – हेमंत रासने

Dnyaneshwar Katke | ‘तुळापुरातील स्मारकासही आराखड्याप्रमाणे तातडीने निधी मंजूर करावा’; शिवसेनेच्या ज्ञानेश्वर कटके यांच्या मागणीची दखल घेत आदित्य ठाकरेंनी दिलं ‘हे’ आश्वासन