Anti Corruption Bureau Thane | 50 हजार रुपयांच्या लाच प्रकरणी ‘उत्पादन शुल्क’मधील अधिकाऱ्यासह दोघे अँटी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – वाईन शॉपवर कारवाई न करण्यासाठी 50 हजार 300 रुपयांच्या लाचेची मागणी (Demanding Bribe) करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department, Maharashtra) एका बड्या अधिकाऱ्यांसह दोघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Thane) अटक केली आहे. दुय्यम निरीक्षक निलेश गोसावी Deputy Inspector Nilesh Gosavi (वय-39 रा. कोपरी, ठाणे) आणि खासगी व्यक्ती उमेश राठोड (Umesh Rathore) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Thane) ही कारावाई गुरुवारी (दि.16) केली आहे. दोघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात (Kopari police station) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

तक्रारदार यांनी चालविण्यासाठी घेतलेल्या वाईन शॉपवर (wine shop) 11 नोव्हेंबर 2021 रोजी उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली होती. या कारवाईमध्ये मदत करण्यासाठी आणि भविष्यात कोणतीही कारवाई न करण्यासाठी दुय्यम निरीक्षक गोसावी यांनी स्वत:साठी तसेच राज्य उत्पादन शुल्काच्या कोपरी येथील इतर अधिकाऱ्यांसाठी दरमहा 64 हजार रुपयांचा हप्ता मागितला.

लाचेची ही रक्कम स्विकारण्यास खासगी व्यक्ती उमेश राठोड याला प्रोत्साहित केले.
गोसावी यांनी मागणी केलेल्या लाचेच्या रक्कमेत राठोड याने तडजोड करुन 50 हजार 300 रुपयांची मागणी केली.
याप्रकरणी तक्रारदाराने 11 नोव्हेंबर रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau Thane) तक्रार केली होती.
पथकाने 12 नोव्हेंबर रोजी याची पडताळणी करुन 16 डिसेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास कोपरी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली.

Web Title :- Anti Corruption Bureau Thane | State Excise Department maharashtra officer arrest by ACB thane for Demanding Bribe 50000

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 877 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Anil Parab | अनिल परब यांची सुरक्षा वाढवली; जाणून घ्या कारण

SCSS | पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना तुमच्यासाठी ठरू शकता लाभदायक ! केवळ पाच वर्षाच्या मॅच्युरिटीवर देईल 14 लाख रुपये; जाणून घ्या

Rytasha Rathore Topless Photos | छोट्या पडद्यावरील रिताशा राठोडनं इंस्टाग्रामवर शेअर केले टॉपलेस फोटोज्, तिच्या न्यूड फोटोनं सोशल मीडियाचा वाढवला पारा

शशी थरूर यांनी मिस Miss Universe Harnaaz Sandhu सोबत फोटो पोस्ट करून दिल्या शुभेच्छा, परंतु पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल