साडेचार हजराची लाच स्विकारताना तलाठी अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

केडगाव (सांगली) : पोलीसनामा ऑनलाईन  

शेत जमीनीवर असलेल्या कराराची नोंद कमी करण्यासाठी ५ हजार रुपये लाच मागून ४ हजार ५०० रुपयांची लाच स्विकारताना केडगावचा तलाठ्याला अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (सोमवार) रामापूर तलाठी कार्यालयात करण्यात आली.

सुरशे सुखदेव रुपनर (वय-५१) असे लाच घेताना अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका व्यक्तीने अॅन्टी करप्शनच्या कार्यालयात तक्रार दिली होती.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d938d8f6-c55a-11e8-b1a4-a5167eab4d97′]

तक्रारदार यांनी केडगाव तालुक्यातील रामापूर येथे शेत जमीन आहे. या शेत जमीनीवर असलेल्या ई कराराची नोंद कमी करण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता. ई करार कमी करण्यासाठी तलाठी सुरेश रुपनर याने पाच हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने रविवारी (दि. ३० सप्टेंबर)  अॅन्टी करप्शनच्या कार्य़ालयात तक्रार नोंदविली होती.

तक्रारदाने केलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता तलाठी सुरेश याने पाच हजार रुपयांची लाच मागितली असल्याचे उघड झाले. तक्रारदार आणि तलाठी सुरशे रुपनर यांच्यामध्ये झालेल्या तडजोडीत साडेचार हजार रुपये देण्याचे ठरले. अॅन्टी करप्शनच्या पथकाने रामापूर तलाठी कार्यालयात आज (सोमवार) सापळा रचला. त्यावेळी सुरेश रुपनर याने तक्रारदाराकडून साडेचार हजार रुपयांची लाच घेतना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्या विरुद्ध चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B017WDVV3M,B01M3QQOAX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4265b3a4-c55a-11e8-9128-4f92a80437a5′]

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे उपायुक्त, पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, अपर पोलीस अधीक्षक राजकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक राजेंद्र तेंडुलकर, पोलीस कर्मचारी अविनाश सागर, संजय कलकुटगी, राधीका माने, राजेंद्र काळे, संजय संकपाळ, भास्कर भोरे, बाळासाहेब पवार यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांक किंवा ७८७५३३३३३३ या व्हॉट्स अॅप नंबरवर संपर्क साधावा.
जाहिरात