Anti Corruption Nagar | BHMS च्या विद्यार्थिनीकडून तब्बल 1.50 लाखाची लाच घेताना प्राचार्य, लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, जिल्ह्यात प्रचंड खळबळ

अहमदनगर न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –   Anti Corruption Nagar | बीएचएमएस (BHMS) अभ्यासक्रमाच्या एका विद्यार्थिनीला पदवी प्रमाणपत्र आणि इंटर्नशीप केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तब्बल 1.50 लाख रुपयाची लाच स्वीकारताना वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य आणि लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात सापडले आहेत. ही घटना नगर (Anti Corruption Nagar) येथील श्रीरामपूर (shrirampur) तालुक्यातील शिवा ट्रस्ट संचलित शरदचंद्रजी पवार होमिओपॅथीक होमिओपॅथी मेडीकल कॉलेजमध्ये (Sharad Chandraji Pawar Homeopathic Homeopathy Medical College) घडली आहे. लाचप्रकरणी प्रभारी प्राचार्य बापूसाहेब बाळासाहेब हरिश्चंद्रे (52 रा. मानूर, ता-राहुरी) आणि लिपिक भारती बापूसाहेब इथापे (वय 34 रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर) यांना अटक (Arrested) केली आहे.

अधिक माहिती अशी, गंगापूरच्या या विद्यार्थिनीने या वैद्यकीय महाविद्यालयात BHMS चे शिक्षण घेतले.
तिचे उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, इंटर्नशीप पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देणे, या कालावधीतील गैरहजेरीची अडजेस्टमेंट करणे यासाठी 1 लाख 47 हजार 500 रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाचे पीआय शाम पवरे (PI Sham Pvare) यांनी पंचासमोर जाऊन पडताळणी केली.
तेव्हा प्राचार्य हरिश्चंद्रे (Principal Harishchandra) यांच्या सांगण्यावरून लिपिक इथापे (Clerk Ithape) यांनी लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले.

 

यावरून दोघा सापळा रचून आरोपीना ताब्यात घेतले. प्रभारी प्रचार्य आणि लिपिकाला पकडण्यात आले. याबाबत तक्रार औरंगाबाद जिल्ह्यातील गांगापूरच्या एका विद्यार्थीनीच्या पालकांनी तक्रार दिली होती. याप्रकरणी त्या दोघा विरोधात श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात (Shrirampur City Police Station) गुन्हा दाखल केला असून आरोपींना उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
या दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (ACB) उपअधीक्षक हरीष खेडकर यांच्या
मार्गदर्शनाखाली पीआय दीपक करांडे, संतोष शिंदे, रमेश चौधरी, रविंद्र निमसे, वैभव पांढरे,
बाबासाहेब कराड, महिला पोलीस अंमलदार संध्या म्हस्के, हारुन शेख, राहुल डोळसे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Advt.

Web Title : Anti Corruption Nagar | ahmednagar interim principal of homoeopathic medical college arrested for taking bribe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Today | सोन्यात जबरदस्त वाढ, चांदी सुद्धा महागली; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवीन दर

Pune Crime | पुण्यात महिलेचा खून करुन मृतदेह फेकला नदीत

Pimpri Crime | हॅलो… मी शरद पवार बोलतोय, पैसे देऊन प्रकरण संपवून टाक !, शरद पवारांचा आवाज काढून खंडणी मागणाऱ्यावर FIR