Anti Corruption Nashik | लाचखोर महिला शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांना अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Anti Corruption Nashik | बुधवारी नाशिकमध्ये 8 लाख रुपयांची लाच (8 Lakh Bribe) स्वीकारल्या प्रकरणी एका महिला शिक्षणाधिकाऱ्याला अटक (arrest) करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर झनकर (Education Officer Dr. Vaishali Veer-Zankar) यांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी (Anti Corruption Nashik) ताब्यात घेतले आहे.

शिक्षणाधिकारी वैशाली झनकर (Dr. Vaishali Veer-Zankar) यांना ACB ने अटक केली आहे. मात्र, आजच त्यांनी वकिलामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. दरम्यान, झनकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पथकानं त्यांच्या घराची झाडाझडती घेतली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. झनकर यांच्या नावावर सुमारे 3 एकर जमीन आणि 4 फ्लॅट अशी स्थावर मालमत्ता आढळून आली आहे. याप्रकरणी आता शासनाने देखील शिक्षण आयुक्तांना (Commissioner of Education) वैशाली झनकर यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. म्हणून याप्रकरणी आता शिक्षण आयुक्त काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

या दरम्यान, मागील 2 दिवसांपासून वैशाली यांचा शोध सुरु होता.आरोपी शिक्षणाधिकारी वैशाली झनकर या फरार होत्या. मात्र, आता त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आले आहे. ठाणे अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले (Thane ACB SP Dr. Punjabrao Ugale) यांच्या टीमने वैशाली झनकर (Dr. Vaishali Veer-Zankar) यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, अटकपूर्व जामिनासाठी डॉ. वैशाली यांनी न्यायालयात (Court) अर्ज केला होता. तर आज आरोपी शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

हे देखील वाचा
Gold-Silver Price Today | 2 आठवड्यात 2000 रुपयांनी सोनं झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचा दर
Delta Plus Variant | मुंबईत 60 वर्षीय महिलेचा डेल्टा प्लसने मृत्यू; आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट’

Ayurveda Expert Balaji Tambe | आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. बालाजी तांबे यांचे निधन कोरोनाने?

Parambir Singh | परमबीर सिंग यांच्याविरोधात ‘लूकआउट’ नोटीस जारी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Anti Corruption Nashik | acb arrest corrupt woman education officer dr vaishali zankar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update