Anti Corruption Nashik | 8 लाखांच्या लाच प्रकरणी महिला शिक्षणाधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; महासंचालकांच्या आदेशाने ठाणे ACB कडून नाशिकमध्ये कारवाई, प्रचंड खळबळ

नाशिक : Anti Corruption Nashik | जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली पंकज वीर ऊर्फ झनकर (44) यांच्यावर 8 लाख रुपयांच्या लाच (zilla parishad education officer vaishali zankar) प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल (Anti Corruption Nashik) केला आहे. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस महासंचालकांच्या आदेशाने ठाणे एसीबीने (Thane) कारवाई करुन शासकीय चालकासह एका शिक्षकाला ताब्यात घेतले आहे.

शासनाने मंजूर केलेल्या दोन शिक्षण संस्थांच्या शाळांच्या 20 टक्के अनुदानानुसार नियमित वेतन सुरु करण्याकरीता झनकर (vaishali zankar) यांनी कार्यादेश काढण्यासाठी 9 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार संस्थाचालकांनी थेट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या राज्याचे महासंचालकांकडे तक्रार केली होती. त्यानुसार त्यांनी ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे ही तक्रार सोपविली.

या तक्रारीची शहानिशा करत पडताळणी केली असता त्यात लाच मागितली गेल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीअंती 8 लाख रुपये देण्याचे ठरले. ठाणे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या आदेशान्वये मंगळवारी नाशिक जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारालगत सापळा रचला.
तडजोड व्यवहारात ठरल्याप्रमाणे मंगळवारी सायंकाळी 8 लाख रुपयांची रक्कम स्वीकरण्यासाठी
झनकर यांचा शासकीय मोटार वाहनचालक ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले हा जिल्हा परिषदेबाहेरील
सिग्नलजवळ आला. तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारताना त्याला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.
त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रात्री जिल्हा परिषदेत चौकशी व पडताळणी
केली असता झनकर यांनी तडजोडीअंती 8 लाखांची रक्कम स्वीकारल्याचे मान्य करीत पुढील
व्यवहार चालक येवलेसोबत करण्यास सांगितले होते. याप्रकरणी राजेवाडी प्राथमिक शाळेचे शिक्षक
पंकज दशपुते यांना या पथकाने ताब्यात घेतले आहे. झनकर यांच्याविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक
कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा

Taliban Terrorism | अफगाणिस्तानमध्ये राहणार्‍या भारतीयांसाठी सुरक्षा अ‍ॅडव्हायजरी जारी, ’तात्काळ’ मायदेशी परतण्याचा सल्ला

Blood Donation Camp | आचार्य आनंदऋषी यांच्या 121 व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Anti Corruption Nashik | Nashik zilla parishad education officer vaishali zankar caught by police in bribery case driver arrested for accepting bribe of rs 8 lakh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update