पुण्यात 7000 ची लाच घेताना नायब तहसीलदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ऐपतदार दाखला देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच घेताना निवासी नायब तहसीलदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. विकी मदनसिंग परदेशी (वय३७, रा. विंडवर्ड सोसायटी, वाकड) असे त्यांचे नाव आहे. परेदशी हे  पिंपरी चिंचवडमधील अपर हवेली तहसीलदार कार्यालयात निवासी नायब तहसीलदार आहेत.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले की, तक्रारदार यांना ऐपतदार दाखला हवा होता. त्यासाठी त्यांनी हवेली तहसीलदार कार्यालयात अर्ज केला होता. त्यांना दाखला देण्यासाठी परदेशी यांनी ७ हजार रुपयांची लाच मागितली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे ही तक्रार आल्यावर त्याची पडताळणी करण्यात आली.

त्यात परेदशी यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बुधवारी पिंपरी चिंचवडमधील अपर हवेली तहसीलदार कार्यालयात सहायक पोलीस आयुक्त श्रीहरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी विनोद भोकरे, नंदलाल गायकवाड, मुश्ताक खान, प्रशांत बोºहाडे, अविनाश इंगुळकर यांनी सापळा रचला. तक्रारदाराकडून ७ हजार रुपये स्वीकारताना परदेशी यांना पकडण्यात आले.  सहायक पोलीस आयुक्त सीमा मेहेंदळे या अधिक तपास करीत आहेत़.

 

Visit : policenama.com