Anti-Corruption | पोलिस उपनिरीक्षक 80 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ

आष्टी : पोलीसनामा ऑनलाइन – बीड जिल्ह्यातील (Beed) आष्टी (Ashti) तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector Rahul Lokhande) राहुल लोखंडे यांना 80 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (Anti-Corruption) रंगेहात पकडले आहे. सदरची कारवाई औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Aurangabad Anti-Corruption) सोमवारी (26, जुलै) रोजी दुपारी केली आहे.

औरंगाबाद एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, अंभोरा पोलीस स्टेशनचे (Ambhora Police Station) लोकसेवक पोलीस उपनिरीक्षक राहुल पांडूरंग लोखंडे (Police Sub Inspector Rahul Lokhande) (रा.तिरूपती पार्क, पिसादेवी पार्क – A प्लाँट नंबर 02 औरंगाबाद) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी 20 जुलै रोजी तक्रारदारविरूध्द अंभोरा पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात मंजूर असलेला अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाकडून रद्द न करण्यासाठी आणि गुन्ह्यात असलेल्या गाड्या जप्त न करण्यासाठी 1 लाख रुपयांची मागणी केली होती.

दरम्यान, तडजोडी नंतर 80 हजार रूपये देण्याचं ठरलं.
त्यांनतर सोमवारी (26, जुलै) रोजी औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (ACB) कारवाई करत राहुल लोखंडे यांना रंगेहात पकडलं आहे.
याबाबत अभोरा पोलीस ठाण्यात (Ambhora Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title :- Anti-Corruption | police sub inspector rahul lokhande of abhora police station ashti taluka was caught taking bribe rs 80000

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik Crime | दोघा भावांवर सपासप वार करत जीवघेणा हल्ला; नाशिक शहरातील खळबळजनक घटना, Video व्हायरल

Pune Crime | 58 गुंठे जमीन बळकवण्यासाठी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याच्या धमकीच्या गुन्ह्यातील संशयित नितीन हमनेचा जामीन मंजूर

Energy Policies | शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा, ‘हे’ 4 देश करतील जगाचा विध्वंस; महाविनाश रोखण्यासाठी घ्यावी लागेल ‘अ‍ॅक्शन’