Anti Corruption | 20 हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – खरेदी खताची प्रत देण्यासाठी 20 हजार रुपयाची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा (Anti Corruption) रचून अटक केली. अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption ) पोलीस उपनिरीक्षक राजू लेवटकर (PSI Raju Lewatkar) याला मध्यस्थामार्फत लाच घेताना (Accepting Bribe) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

पोलीस उपनिरीक्षक राजू लेवटकर हा अमरावती पोलीस दलातील (Amravati Police Force) गाडगेनगर पोलीस ठाण्यात (Gadgenegar Police Station) कार्यरत आहेत. राजू लेवटकर यांनी तक्रारदारांना खरेदी खताची प्रत देण्यासाठी त्यांच्याकडून यापूर्वी तीस हजार रुपये लाच घेतली होती. त्यानंतर लेवटकर याने रोहन भोपळे (Rohan Bhopale) याच्या मध्यस्तिने 20 हजार रुपयाची मागणी केली होती. राजू लेवटकर व रोहन भोपळे यांनी तक्रारदारांकडून 20 हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ (Anti Corruption) पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड (SP Vishal Gaikwad),
अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत (Additional Superintendent of Police Arun Sawant),
संजय महाजन (Sanjay Mahajan), एस.एस. भगत (S.S. Bhagat)
यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

Web Titel :- Anti Corruption | psi raju lewatkar caught red handed while accepting a bribe of rs 20000

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | नगरपरीषदेच्या इमारतीवरील अक्षरांचा रंग गेल्याचे पाहून अजित पवार संतापले; अवघ्या 2 तासात ‘चेंज’

Auto Debit Cheque Book Pension Rules | 5 दिवसानंतर बदलतील ‘हे’ 6 नियम, पेमेंट आणि चेकबुक संबंधित नियमामुळे सॅलरीसह इतर गोष्टींवर होणार परिणाम

Maharashtra Rains | मुंबईसह राज्यात रविवारपासून मुसळधार पावसाची शक्यता