Anti Corruption | मिरज तहसील कार्यालयातील अव्वल कारकून अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Anti Corruption | जमिनीसंदर्भातील निकाल बाजूने देण्यासाठी २५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी मिरज तहसील कार्यालयातील अव्वल कारकुनाला ताब्यात घेण्यात आले आहे. श्रीशैल ऊर्फ श्रीकांत विश्वनाथ घुळी (वय ५६, रा. शिवाजी नगर, मालगांव ता. मिरज) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. त्याचबरेाबर घुळी यांच्या कार्यालयातील संगणक चालक समीर जमादार (वय ३६, रा. ग्रामपंचायत जवळ मल्लेवाडी ता. मिरज) यालाही ताब्यात (Anti Corruption) घेण्यात आले.

मिळालेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांची आई वारसदार असलेल्या जमिनीच्या संदर्भातील निकाल तक्रारदार यांचे बाजूने देण्यासाठी ७० हजार रुपये देण्याची मागणी मंडल अधिकारी घुळी व त्यांचे कार्यालयात काम करणारे संगणक ऑपरेटर समीर जमादार याने केली होती. त्यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २८ ऑगस्ट २०२१ तक्रारदाराने अर्ज केला होता. त्यानंतर दि. २९, दि. ३० तसेच १ व २ सप्टेंबर रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे या तक्रारीची पडताळणी झाली. घुळी यांनी तक्रारदार यांच्या बाजून निकाल देण्यास सांगितले. त्यांनंतर तक्रारदार यांच्याकडे कार्यालयात काम करत असलेले समीर जमादार यांनी ७० हजाराची मागणी केली.

त्यानुसार त्यापैकी २५ हजार रूपये देण्यास सांगून उर्वरीत ४५००० रूपये निकाल लागल्यानंतर देण्याचे ठरले. सांगली येथे राजवाडा परिसर मंडल अधिकारी कार्यालयात लाचलुचपत विभागाने सापळा लावला. त्यामध्ये समीर जमादार हा तक्रारदाराकडून २५ हजार रुपये घेताना मिळून आला. त्यानंतर श्रीशैल घुळी यांनाही ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, पोलीस
अंमलदार अविनाश सागर, सलीम मकानदार, संजय संकपाळ, अजित पाटील, प्रीतम चौगुले, भास्कर भोरे,
राधिका माने, विना जाधव, श्रीपती देशपांडे, चालक बाळासाहेब पवार यांच्या पथकाने केली. दरम्यान, लाच
मागणी संबंधाने तक्रारी असल्यास येथील पोलीस उपअधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Pimpri Crime | थकीत घरभाडे मागण्यासाठी गेलेल्या घरमालकाच्या मुलाला चौथ्या मजल्यावरुन ढकललं, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

Sanjay Raut | ‘बेळगाव महापालिकेवर भगवाच फडकेल’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Anti Corruption | Top clerk of Miraj tehsil office in anti-corruption net

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update