Anti Corruption Trap | मानधनाचे बिल मंजूरीसाठी लाच घेणारे दोन डॉक्टर ACB च्या जाळ्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – मानधनाचे बिल मंजूर करण्यासाठी प्रत्येकी 1000 रुपयांची लाच (Bribe) स्विकारणाऱ्या दोन डॉक्टरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून (Anti Corruption Trap) रंगेहाथ पकडले. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईमुळे (Anti Corruption Trap) वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. लाच घेणाऱ्यांमध्ये एक तालुका आरोग्य अधिकारी (Taluka Health Officer) आहे.

डॉ. भुषण पंडीत मोरे (Dr. Bhushan Pandit More) आणि डॉ. पंकज बारकू वाडेकर (Dr. Pankaj Barku Wadekar) असे लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या दोन डॉक्टरांची नावे आहेत. डॉ. भुषण मोरे हे आरोग्य विभागाचे तालुका अधिकारी आहेत. याप्रकरणी शिंदखेडा तालुक्याच्या नरडाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (anti corruption bureau) तक्रार दिली.

तक्रारदार हे शिंदखेडा तालुक्याच्या नरडाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत असून त्यांनी केलेल्या एनआरएचएम (NRHM) अंतर्गत कामाच्या मानधनाचे 17 हजार रुपयांचे बिल होते. हे बिल मंजूर करण्यासाठी डॉ. मोरे आणि डॉ. वाडेकर यांनी प्रत्येकी 1000 रुपयांची लाच मागितली.

धुळे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने तक्रारीची पडताळणी करुन शुक्रवारी (दि. 23) सापळा रचला.
डॉ. मोरे आणि डॉ. वाडेकर या दोघांना तक्रारदार यांच्याकडून प्रत्येकी 1000 रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
या दोघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
अशी माहिती पोलीस उपअधीक्षक सुनिल कुराडे (Deputy Superintendent of Police Sunil Kurade) यांनी दिली.

Web Title : Anti Corruption Trap | dhule news two doctors caught in dhule acbs trap bribe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Rain | पुण्याच्या रास्ता पेठेतील केईएम हॉस्पीटलसमोर भरपावसात रिक्षावर झाड कोसळलं; चालकासह महिला जखमी (व्हिडीओ)

Pune Crime | पुण्यातील सायकलचोर ‘आशिक’ पोलिसांच्या जाळ्यात, कोरोनाकाळात केले ‘हे’ उद्योग, जाणून घ्या प्रकरण

Modi Government Schemes | मोदी सरकारच्या ‘या’ 12 योजना, ज्यांच्याद्वारे कर्जापासून उपचारापर्यंत मिळतेय लाखो रुपयांची मदत, जाणून घ्या