Anti Corruption Trap | साडे सात लाख रुपयांच्या लाच प्रकरणी पोलीस निरीक्षकासह 2 अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात; राज्य पोलीस दलात खळबळ

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Anti Corruption Trap |मुरुम चोरी (Thift) प्रकरणातील आरोपींला सहकार्य करतो, असे सांगून साडेसात लाखांची लाच (Bribe) स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागा (anti corruption bureau ) ने सापळा रचून सलगर वस्ती पोलीस ठाण्या (Salgar Vasti Police Thane) चे सहायक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे (Assistant Inspector of Police Rohan Khandagale) याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पवार (Senior Police Inspector Sampat Pawar) यालाही अटक  (Arrest) करण्यात आली आहे. Anti Corruption Trap | police inspector and police sub inspector of solapur are in anti corruption trap of seven and half lakh bribe

 

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

संपत पवार हा ३२ वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत आहे. अडीच वर्षांपूर्वी त्याने सलगर वस्ती पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारला होता. येत्या ४ महिन्यात तो सेवानिवृत्त होणार होता. निवृत्तीआधीच तो सापळ्यात अडकला. तक्रारदारावर मुरुम चोरी प्रकरणी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात जप्त केलेली वाहने सोडावीत, तसे गुन्ह्यात मदत व सहकार्य करावे, यासाठी संपत पवार व रोहन खंडागळे यांनी १० लाख रुपयांची मागणी केली होती.

तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याची पडताळणी करताना तडजोडीअंती ती रक्कम साडेसात लाखांवर आली. ही साडेसात लाख रुपये स्वीकारण्यासाठी एपीआय खंडागळे हा पुणे रोडवरील एका ठिकाणी थांबला होता.
मोबाईलवरुन संपत पवारही त्याच्या संर्पकात होता.
जुना पूना नाका परिसरात तक्रारदाराकडून साडेसात लाख रुपये स्वीकारताना खंडागळे याला पकडण्यात आले.
त्याचबरोबर संपत पवार यालाही पकडण्यात आले.

या सापळा कारवाईनंतर रात्री उशिरा दोघांच्या घराची झडती घेण्यास सुरुवात करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या घराची झडती घेण्याचे काम सुरु होते.
पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कविता मुसळे व त्यांच्या सहकार्‍यांनी ही कारवाई केली.
पोलीस निरीक्षक संपत पवार यांची या पूर्वी पुण्यातील गुन्हे शाखेत आणि दत्तवाडी पोलीस ठाण्यात नोकरी झाली आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : Anti Corruption Trap | police inspector and police sub inspector of solapur are
in anti corruption trap of seven and half lakh bribe

 

हे देखील वाचा

Pune News | ‘आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं, आम्हाला काही नको’,
तुम्ही एकत्र येऊन मार्ग काढा, संजय राऊतांचा पुण्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना सल्ला

Pune News | पोलीसनामाच्या बातमीचा दणका ! अखेर शिरुरचे नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांच्यावर निलंबनाची कारवाई

Pimpri Crime News | ‘बजाज’ मधून निम्म्या किंमतीत गाड्यांचे आमिष पडले साडेसात लाखांना; बजाज कंपनीत अधिकारी असल्याचे सांगून दोघा भावांनी घातला व्यावसायिकाला गंडा