Anti Corruption Trap | 40 हजाराची लाच घेताना राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यासह पंटर अँटी करप्शनच्या जाळ्यात

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन  Anti Corruption Trap | वडिलांच्या नावे परवाना असलेल्या बार रेस्टॉरंटमधील स्टॉक रजिस्टर व गोडाऊनमध्ये ठेवलेल्या मालामध्ये तफावत असल्याचे दाखवून कारवाई करणार असल्याचे सांगितले. कारवाई न करण्यासाठी 50 हजार रुपयाची लाच मागून 40 हजार रुपयाची लाच स्विकारताना (Accepting Bribe) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यासह (State Excise Officer) त्याच्या खाजगी पंटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि.9) मलकापूर अर्बन बँकेसमोर सापळा रचून (Anti Corruption Trap) करण्यात आली.

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क संजय उत्तमराव केवट Sanjay Uttamrao Kewat (वय-46)
आणि खासगी व्यक्ती प्रशांत बाबुराव सांगोले Prashant Baburao Sangole (रा. देवीनगर वडाळी) अशी लाच घेताना अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

तक्रारदार यांच्या वडीलांच्या नावे परवाना असलेले बार रेस्टॉरंट (Bar Restaurant) यामध्ये दुय्यम
निरीक्षक संजय केवट यांनी तुमच्या स्टॉक आणि गोडाऊनमधील मालामध्ये तफावत असल्याचे सांगून 50 हजार रुपयाची लाच मागितली.
तडजोडीमध्ये 40 हजार रुपये देण्याचे ठरले होते.
याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर पडताळणीमध्ये 40 हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले.
पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड (SP Vishal Gaikwad) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष इंगळे (Police Inspector Santosh Ingle), सतीश उंबरे, सुनील वऱ्हाडे,
युवराज राठोड, महेंद्र साखरे, अभय वाघ, तुषार देशमुख, निलेश महिंगे, सतीश किटुकले,
चंद्रकांत जनबंधू, उपेंद्र थोरात यांनी केली.

 

Web Title : Anti Corruption Trap | state excise officer caught red handed taking bribe in nagpur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Crime News | भाजपच्या महिला पंचायत समिती सदस्याची आत्महत्या, प्रचंड खळबळ

Anna Hazare | अण्णा हजारेंचा ठाकरे सरकारला आंदोलनाचा इशारा; पुन्हा बसणार उपोषणाला

Railway Recruitment 2021 | रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी ! विविध पदांसाठी होणार भरती, परीक्षेविना थेट नियुक्ती