Anti Corruption Trap | 30 हजाराची लाच घेताना तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात; प्रचंड खळबळ

भंडारा न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Anti Corruption Trap | अवैध वाळू वाहतूक सुरु ठेवण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच (Bribe) स्विकारताना भंडारा जिल्ह्यातील (Bhandara district) मोहाडी तालुक्याचे तहसीलदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा (Anti Corruption Trap) रचून अटक (arrest) केली. देविदास बोंबुर्डे (Devidas Bomburde) असे लाच घेताना रंगेहाथ पकण्यात आलेल्या तहसीलदाराचे (Tehsildar) नाव आहे. एसीबीने केलेल्या या सापळा (Anti Corruption Trap) कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

तक्रारदार हे वाळू व्यावसायिक असून त्यांच्याकडे असलेल्या 2 ट्रॅक्टरने अवैधरित्या वाळू वाहतूक सुरु आहे. ही वाहतूक सुरु ठेवण्यासाठी तहसीलदार देविदास बोंबुर्डे यांनी प्रति ट्रॅक्टर 15 हजार याप्रमाणे दोन ट्रॅक्टरचे 30 हजार रुपये हप्ता मागितला. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (anti corruption bureau) तक्रार दिली.

 

तक्रारदार यांच्या तक्रारीची शहानिशा करुन शुक्रवारी (दि.23) सापळा रचून तहसीलदार यांना 30 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
आरोपी तहसीलदार विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
लाचलुचपत विभागाने एका बड्या अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्याने जिल्ह्यातील इतर भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title : Anti Corruption Trap | tehsildar arrested for accepting bribe of rs thirty thosands

Pimpri Chinchwad Police | रावण टोळी प्रमुखाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या 6 सराईतांना अटक; पिस्तुल, काडतुस जप्त

Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्रा केसमध्ये समोर आला शर्लिन चोपडाचा नवीन व्हिडिओ, केला धक्कादायक खुलासा (व्हिडीओ)

Varsha Gaikwad | शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा, यंदाही शाळेच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात