Anti Corruption | 25 हजाराची लाच घेताना महिला अधिकाऱ्यासह दोघे अँटी करप्शनच्या जाळ्यात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या हरकत दाव्याचा निकाल तक्रारदारच्या बाजूने देण्यासाठी 25 हजार रुपयाची लाच घेणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यासह दोन कोतवाल यांना कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption) सापळा रचून (Anti Corruption) अटक केली. मंडल आधिकारी सजा गड मुडशिंगी अर्चना मिलिंद गुळवणी Archana Milind Gulwani (वय -47 रा. संभाजीनगर, कोल्हापूर), कोतवाल तात्यासो धनपाल सावंत Tatyaso Sawant (वय 38, रा. वसगडे, ता.करवीर), युवराज कृष्णात वड्ड Yuvraj Wadd (वय – 35 रा. गडमुडशिंगी, ता. करवीर) असे लाच घेताना रंगेहाथ (Accepting Bribe) पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई आज (बुधवारी) करण्यात आली.

याप्रकरणी 35 वर्षीय व्यक्तीने कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.
तक्रारदाराने खरेदी केलेल्या शेतजमीनीला हरकत घेण्यात आली होती.
ही हरकत निकाली काढून तक्रारदाराच्या बाजूने निकाल दिल्याचे सांगून वसगडे गावचा कोतवाल तात्यासो सावंत आणि गडमुडशिंगीचा कोतवाल युवराज वड्ड या दोघांनी 30 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
तडजोडीमध्ये 25 हजार देण्याचे ठरले होते.

तक्रारदार यांच्या तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 27 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट कालावधीत पडताळणी केली.
यानंतर आज (बुधवार) 25 हजार रुपयांची लाच स्विकारताना तात्यासो सावंत याला सापळा रचून अटक केली.
लाच घेण्यास मंडल अधिकारी अर्चना गुळवणी यांचीही समंती असल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले.
त्यानंतर त्यांनाही ताब्यात घेतण्यात आले.

 

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (SP Rajesh Bansode), अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव (Additional Superintendent of Police Suraj Gurav), सुहास नाडगौडा (Suhas Nadgauda) यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक आदिनाथ बुधवंत (Deputy Superintendent of Police Adinath Budhwant), पोलीस निरीक्षक सतिश मोरे (Police Inspector Satish More),
पोलीस हेड कॉन्स्टेबल शैलेश पोरे, पोलीस नाईक सुनिल घोसाळकर, विकास माने, रूपेश माने यांच्या पथकाने केली.

 

Advt.

Web Title : Anti Corruption | Two, including a woman officer, caught in anti-corruption scam while accepting a bribe of Rs 25,000

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | ‘2 मोबाईल, 3 सीमकार्ड जेलमध्ये पोहच कर’ ! येरवडयातून ‘गँगस्टर’ सागर राजपूतनं पाठवली राणी मारणेला सांकेतिक भोषत चिठ्ठी, दिल्या वसुलीसाठी सूचना; पोलिस तपास सुरू

Pune Crime | जीव देण्याची धमकी देत 36 वर्षीय पत्नीवर 35 वर्षीय पतीचा अनैसर्गिक अत्याचार

Rangnath Vani | शिवसेनेचे माजी आमदार रंगनाथ वाणी यांचे निधन