रेल्वेच्या तीन अधिकाऱ्यांविरुध्द अ‍ॅट्रासीटीचा गुन्हा

अकोला – पोलीसनामा ऑनलाईन – रेल्वे विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणूण कार्यरत असलेल्या प्रकाश बोदडे नामक कर्मचाऱ्याला त्याची जात पाहून काम दिल्याने आणि नियमांचा भंग करीत त्याचा छळ केल्याप्रकरणी रेल्वेच्या सीनीयर डीएन कॉर्डीनेशन डी. डी. नागपुरे, रेलपथ निरीक्षक निरंजन रवाणी आणि कनीष्ठ अभियंता आशुतोष यादव या अभियंत्यांविरुद्ध अकोला जीआरपी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बोदडे यांची अशी केली अधिकाऱ्यांनी पिळवणूक…

प्रकाश राहुलकुमार बोदडे यांना त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागेवर कामावर घेण्यात आले असून. त्यांना रेल्वेविभागाच्या लार्जेस योजनेतंर्गत रेल्वेमध्ये ट्रॅकमॅन आकोटे येथे नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना रेल्वे यार्ड क्रमांक १६ येथे कार्यरत होण्याचे आदेश देण्यात आले. मात्र त्या दरम्यान, सिनीयर सेक्शन इंजीनीअर निरंजन रवाणा याने प्रकाश बोदडे यांना ट्रॅक वरील साफसफाई करण्याचे काम दिले काम दिले. नियमानुसार लार्जेय योजनेतंर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला त्याच्या घराजवळ असलेल्या कार्यालयात काम देणे बंधनकारक असते. मात्र, असे असून देखील त्यांनी त्याची जात खालच्या दर्जाची असल्याने त्याला नेहमी पाण्यात पाहिले. आणि सीनीअर डीएन कॉर्डीनेशन या रेल्वे विभाच्या नांदेडचे डी. डी. नागपूरे यांनी नियम मोडीत काढत बोदडे यांची १८ ऑगस्ट २०१७ रोजी पुर्णा येथे बदली केली. त्यांची अशी तडकाफडकी बदली करणे नियमात बसत नसल्याने बोदडे हे कामावर रुजु झाले नाहीत.

‘या’ कारणामुळे त्यांनी अधिकाऱ्यांविरुद्ध अ‍ॅट्रासीटी गुन्हा केला दाखल…

त्यानंतर पुन्हा २३ ऑगस्ट २०१८ रोजी बोदडे यांची औरंगाबाद येथील लासुर स्टेशन येथे बदली करण्यात आली. आणि त्यानंतर २६ मार्च २०१८ पासून हजेरीपत्रक बंद करून बोदडे यांना कार्यमूक्त करण्याचे पत्र लासुर येथील रेल्वे विभागाला पाठवीले. या विरोधात बोदडे हे कॅटमध्ये गेले असता त्यांना स्थगिती मिळाली. मात्र, त्यानंतरही कनीष्ठ अभियंता आशुतोष यादव याने आदेशाकडे दुर्लक्ष करीत बोदडे यांना कार्यमुक्त केले. आणि यासंदर्भात असणारी फाईल देखील कार्यालातून गहाळ केली. हा मानसिक छळ असह्य झाल्याने प्रकाश बोदडे यांनी त्यांचे वेतन आणि बोनस रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी हा प्रकार केल्याची तक्रार जीआरपी पोलिसात केली. यावरुन अकोला जीआरपीने सीनीयर डीएन कॉर्डीनेशन डी. डी. नागपुरे, रेल्वेपथ निरीक्षक निरंजन रवाणी आणि कनीष्ठ अभियंता आशुतोष यादव या तिघांविरुध्द अ‍ॅट्रासीटीच्या कलमानुसार गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.