कोट्यवधीच्या महापालिकेतील अतिक्रमण विरोधी पोलीस पथक कार्यालयात सुविधाचा अभाव 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

एकेकाळी आशिया खंडात श्रीमंत असलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत विकास कामावर कोट्यावधीच्या निधी खर्च केला जातो.  महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांची कार्यालयेही त्याच पध्द्तीने व्यवस्थित आहेत. मात्र अतिक्रमण विभागाकडे पालिकेने कानाडोळा केल्याचे दिसत आहे. अतिक्रमण विरोधी पोलीस पथकाच्या कार्यालयात सुविधांचा अभाव असल्याने त्या ठिकाणी बसायला खुर्च्याही नाहीत. तर बाहेर जाण्यासाठी असलेली वाहने डिझेल नसल्याने बंद पडून आहेत.

पुणे / पिंपरी : उच्चभ्रू सोसायटीत गणपती मिटींगमध्ये एकाला बेदम मारहाण

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका म्हटले की डोळ्या समोर येतो तो विकास. हीच महापालिका एकेकाळी आशिया खंडात श्रीमंत महानगरपालिका होती. महापालिकेचे हजारो कोटी रुपयांचे वार्षिक बजेट आहे. तर शहरात कोट्यवधी रुपयांची विकास कामे सुरु आहेत. या महापालिकेचे इमारतही त्याच पध्द्तीने आलिशान आहे. तर अधून मधून दुरुस्तीचे काम सुरु असते. या इमारतीमध्ये पदाधिकारी, कर्मचारी यांची दालने, कार्यालयेही नीटनेटकी, इंटरनेट कनेक्ट आहेत.
[amazon_link asins=’B0741G9HVS,B075K83QJK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’173a0a41-acf3-11e8-b0ff-2de4704c827b’]
पिंपरी-चिंचवड शहरात अतिक्रमण हा मोठा विषय आहे. बेकायदेशीरपणे बांधलेल्या इमारती, रस्त्यावर होणारे अतिक्रमण, लाईट पूल व वेगवेगळ्या ठिकाणी केलेले अतिक्रमण ही मोठी कीड आहे. हे अतिक्रमण काढण्यासाठी स्वतंत्र विभाग आहे. तसेच यासाठी पोलीस वेगळे आहेत. महापालिकेच्या आवारात उपहारगृह असणाऱ्या इमारतीमध्ये अतिक्रमण पोलिसांना कार्यालय देण्यात आले आहे.
या कार्यालयात सुविधांचा अभाव आहे. या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव आहे. भिंतीची दुरुस्ती करण्याची गरज आहे. कार्यालयात फर्निचरची कमतरता आहे. बसण्यासाठी टेबल, खुर्च्या नाहीत. विशेष म्हणजे पोलिसांना दिलेली वाहने डिझेल अभावी पडून असतात. त्यामुळे पोलिसांना एकतर खासगी वाहने नाहीतर कार्यालयात बसून रहावे लागत आहे. याकडे महापालिका पदाधिकारी, प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.