बाजारात बनावट नोटा चलनात, ७ लाखांच्या बनावट नोटा जप्त

कोलकाता –  वृत्तसंस्था – देशातील काळा पैसा आणि बनावट नोटांना आळा घालण्यासाठी सरकारने जुन्या नोटा बंद करुन नव्या नोटा चलनात आणल्या. नव्याने चलनात आणलेल्या नोटांसारख्या बनावट नोटा तयार करुन त्या चलनात आणणाऱ्यांवर सरकारकडून कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी कोलकत्ता येथे दोन व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात नव्या चलनातील २००० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.


स्पेशल टास्क फोर्सच्या भारत चलन विरोधी पथकाने ही कारवाई केली. या कारवाईदरम्यान पथकाने दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ७ लाख रुपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. पथकाकडून त्यांची सखोल चौकशी सुरु आहे.
कोलकता येथे अटक करण्यात आलेल्या दोन व्यक्तींकडे २००० रुपयाच्या एकूण सात लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा सापडल्या. इतक्या बनावट नोटा यांच्याकडे आल्याकुठून? या नोटा कुणाला पुरवल्या जात होत्या? याची चौकशी या पथकाकडून करण्यात येत आहे.