Anti Love Jihad Bill | लवकरच अँटी लव्ह जिहाद कायदा? राज्य सरकारच्या हालचालींना वेग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Anti Love Jihad Bill | १९ डिसेंबरपासून महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू होणार आहे. कोरोना आणि इतर कारणांमुळे जवळजवळ तीन वर्षांनंतर हिवाळी अधिवेशन विदर्भात होणार आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद, राज्यपालांचे वक्तव्य आणि ओला दुष्काळ यांसारख्या घटनांमुळे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. त्यातच अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक (Anti Love Jihad Bill) आणण्याची तयारी शिंदे फडणवीस सरकारने केली आहे. आता या विधेयकामुळे अधिवेशन अजून स्फोटक ठरणार आहे.

 

केंद्रात सत्तेवर आल्यापासून भाजपने लव्ह जिहादच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतले आहे. भाजपने त्यांची सत्ता असलेल्या इतर राज्यांमध्येही लव्ह जिहादविरोधी कायदा आणण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत एकूण ११ राज्यांनी लव्ह जिहादसंबंधीचा विधेयक त्यांच्या विधानसभेत मांडला आहे. असे विधेयक मांडणारे महाराष्ट्र बारावे राज्य असेल. तसेच महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या काही घटना घडल्याचा दावा भाजप आमदारांनी केला आहे. दिल्लीत घडलेले श्रद्धा वालकर या हत्या प्रकरणामुळे लव्ह जिहाद मुद्द्यावर खूप चर्चा होत आहे. श्रद्धा वालकर हत्या हा लव्ह जिहादच असल्याचा दावा भाजपने केला आहे.

त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी लव्ह जिहादविरोधात कायदा आणण्याची मागणी भाजप आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांकडून होत आहे.
आता या मुद्द्यावर राज्यातील सत्ताधारी भाजपने त्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
आमदार नीतेश राणे या विधेयकावर अधिक अभ्यास करत आहेत.
तसेच महिलांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणाऱ्या चित्रा वाघ यांनीही अशा कायद्याची आवश्यकता असल्याचे मत मांडले होते.
त्यामुळे हे विधेयक सभागृहात मांडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, एआयएमआयएमसारख्या पक्षांकडून विरोध दर्शविला जाण्याची शक्यता आहे.
आता विधेयकावर शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट काय भूमिका घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

 

Web Title :- Anti Love jihad bill | maharashtra shinde fadnavis government moves to introduce anti love jihad bill in winter session

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Indian Railway | रात्री दहानंतर रेल्वेत आवाज केल्यास गाडीतून उतरावे लागेल

CitiusTech Expands Footprint | सिटीअसटेकने पुण्यात नवीन सुविधांद्वारे केला फूटप्रिंटचा विस्तार

Mohit Kamboj Target Sushma Andhare | ‘सुषमा अंधारे संजय राऊतांचे फीमेल व्हर्जन’ – मोहीत कंबोज