भाजप कार्यालयाजवळ 51 क्रुड बॉम्ब आढळल्याने खळबळ !

कोलकात्ता : विधानसभा निवडणुकीनंतर झालेला हिंसाचार थांबत नाही तोच कोलकात्ता येथील भाजप कार्यालयाजवळ तब्बल ५१ क्रुड बॉम्ब Crude bomb (देशी बॉम्ब) जप्त करण्यात आले आहे. लष्कराने दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. हे सर्व बॉम्ब देशी Crude bomb बनावटीचे असून कमी तीव्रतेचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्य स्थितीत हे सर्व बॉम्ब् निष्क्रीय केले गेले आहेत.

हे बॉम्ब कोलकात्ता पोलिसांच्या अँटी राऊडी सेक्शनने जप्त केले आहेत.

लष्करी इंटेलिन्सने दिलेल्या माहितीवरुन ही पोलिसांनी हे बॉम्ब जप्त केले.

शहरातील हेस्टिंग्स क्रासिंग एरियामध्ये भाजपा कार्यालयापासून केवळ १०० मीटर दूर अंतरावर हे बॉम्ब आढळून आले.

एका पोत्यात हे बॉम्ब भरुन ठेवण्यात आले होते. हे पोते कोणी ठेवले, याचा शोध घेतला जात आहे. त्यादृष्टीने परिसरातील सीसीटीव्हीची फुटेज तपासण्यात येत आहे.

तसेच परिसरातील नागरिकांकडे चौकशी केली जात आहे.

विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळविल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. त्यात अनेक भाजपचे कार्यकर्ते, नेते यांचा बळी गेला.

तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा हिंसाचार घडवून आणल्याचा आरोपी करण्यात आला होता. त्यानंतर आता भाजप कार्यालयाजवळ हे बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पश्चिम बंगालमध्ये असे देशी बॉम्ब सापडण्याची पहिलीच वेळ नाही.

विधानसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्याच्या मतदानाआधी पोलिसांनी ४१ क्रुड बॉम्ब दक्षिण २४ परगणा येथील बरुईपूर परिसरात आढळले होते.

या घटनेच्या आधी बरुईपूरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि ममता बॅनर्जीचे भाचे अभिषेक बॅनजी यांनी रोड शो केला होता.

त्याच्या अगोदर २६ ते २८ मार्च दरम्यान ८२ क्रुड बॉम्ब जप्त करण्यात आले होते.

नरेंद्रपूर परिसरातही ५६ क्रुड बॉम्ब आढळून आले होते.

 

Pune : सोमवारपासून शहरातील दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत खुली राहाणार; संध्याकाळी 5 वाजल्यानंतर मात्र कडक संचारबंदी

 

केसांसाठी सर्वोत्कृष्ट कीवी हेअर मास्क, प्रत्येक समस्येपासून मुक्तता होईल; जाणून घ्या

 

भाजप नेत्या पंकजा मुंडेचे रोखठोक उत्तर, म्हणाल्या – ‘धनंजयच्या खासगी प्रकरणाचे समर्थन करणार नाही, पण…’

 

शॉम्पू केल्याच्या दुसर्‍याच दिवशी केस तेलकट होतात? ‘हे’ घरगुती उपाय येतील तुमच्या कामाला, जाणून घ्या

 

Coronavirus : घरात कोरोना रुग्ण असल्यास कोणती काळजी घ्यावी?, जाणून घ्या