‘व्हॅलेंटाईन डे’लाच पोलिसांनी हॉटेलवर टाकला ‘छापा’, अविवाहीत 24 ‘लफडे’बाज कपल आढळल्यानं ‘खळबळ’

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – 14 फेब्रुवारी रोजी सर्वत्र व्हेलेंटाईन डे मोठ्या उत्सहात साजरा केला जात असताना काही लोक असे देखील होते ज्यांना पोलीस कारवाईचा सामना देखील करावा लागला होता. पोलिसांनी काही हॉटेलांमध्ये छापा टाकून अनेक अविवाहित जोडप्याना अटक केली आहे.

मुस्लिम बहुल राष्ट्र असलेल्या इंडोनेशियामधील हा सर्व प्रकार आहे. या देशामध्ये खुलेपणाने प्रेम व्यक्त करण्याला मनाई आहे. असे करणे या देशाच्या संस्कृती विरोधात असल्याचे मानले जाते. याबाबतची चेतावणी देखील काही शहरांमध्ये देण्यात आली होती यामध्ये सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करण्याला मनाई करण्यात आली होती.

मकस्सर या ठिकाणी पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकून कारवाई करताना रूममध्ये असलेल्या अविवाहित जोडप्यानं अटक केली आहे. यामध्ये एक जर्मन नागरिक देखील समाविष्ट होता. त्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या जोडप्यानं लग्ना आधी संबंध ठेवल्याच्या नुकसानीवर लेक्चर देऊन सोडण्यात आले. परंतु यातील पाच वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना रिहॅब सेंटरमध्ये पाठवण्यात आले.

मकस्सर येथे कंडोमच्या विक्रीवर देखील अनेक प्रकारे बंदी घालण्यात आलेली आहे. कंडोम खरेदी करणाऱ्यांचे वय सक्तीने तपासले जाते. स्थानिक अधिकाऱ्यांचे हे म्हणणे आहे की कंडोम हे फक्त विवाहित लोकांसाठी आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like