वाढत्या वयात देखील जवान दिसाल, फक्त रताळ्यापासून बनवलेले ‘अ‍ॅन्टी एजिंग फेसपॅक’ वापरा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – वाढत्या वयानुसार, सुरकुत्या, फ्रीकल्ससारख्या समस्या उद्भवू लागतात. चेहऱ्याचे सौंदर्य अबाधित राहण्यासाठी महिला बर्‍याच सौंदर्य उत्पादनांचा किंवा उपचाराचा अवलंब करतात; परंतु यामुळे दुष्परिणाम देखील होऊ शकतात. रताळीपासून बनवलेल्या फेस पॅकने पिग्मेन्टेशन, फ्रिकल्स या वृद्धत्व विरोधी समस्या कमी होतील आणि त्वचा डागांपासून मुक्त होईल.

१) रताळी आणि जायफळ
साहित्य
१) गोड बटाटा – ½ चमचा (उकडलेले)
२) जायफळ पावडर – ४ चमचे
३) गुलाबाच्या पाण्याचे काही थेंब

कसे वापरायचे
१) जायफळाची पूड रताळ्यात टाकून मिश्रण तयार करावे.
२) आता गरजेनुसार गुलाब पाणी घाला.
३) हे तयार फेस पॅक १५ मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा.
४) कोरडे झाल्यावर चेहरा पाण्याने स्वच्छ करा.
५) आठवड्यात १ ते २ वेळा हा फेस पॅक वापरल्यास मुरुम आणि काळ्या डागापासून आराम मिळेल.

२) रताळी आणि बदाम तेल
साहित्य
१) रताळी – १ चमचा (उकडलेले)
२) हळद – ४ चमचे
३) बदाम तेल

कसे वापरायचे
१) सर्वप्रथम रताळी, हळद घ्या आणि त्यात बदाम तेलाचे १-२ थेंब घाला आणि चांगले मिसळा.
२) मिश्रण तयार करण्यासाठी आपण ते मिक्सरमध्ये बारीक देखील करू शकता.
३) आता तयार फेस मास्क चेहरा आणि मानेवर १५ मिनिटे लावा.
४) नंतर हलक्या हातांनी मालिश करा आणि चेहरा पाण्याने धुवा.
५) आठवड्यातून दोनदा असे केल्यास वृद्धत्वाच्या समस्येतून मुक्तता मिळेल आणि डागही दूर होतील.