मेडिकलच्या दुकानातून ‘औषध’ खरेदी करताना नेहमी ‘लाल’ निशाणीसह ‘ही गोष्ट’ लक्षात ठेवा, ‘टेन्शन फ्री’ रहाल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोक अनेकदा छोट्या मोठ्या आजाराने त्रस्त असताना डॉक्टरांना न विचारता औषधे खरेदी करतात. ते धोकादायक असू शकते. त्यामुळे तुम्हाला नवे आजार देखील जखडू शकतात. यामुळे सरकारने यासंबंधित काही महत्वाची माहिती दिली आहे. आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे की औषधांच्या पाकिटावर लाल रेष असेल तर ही औषधे डॉक्टरांच्या परवानगी शिवाय सेवन करु नये.

औषधांच्या स्ट्रिपवर लाल रेषेचे कारण –
– ही लाल रेष म्हणजे ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये.
– कोणतेही मेडिकल स्टोरमधून अशी औषधे डॉक्टरांच्या प्रिसक्रिपशन शिवाय विकू शकत नाही, तसेच कोणाला हे औषध घेण्याचा सल्ला देखील देऊ शकत नाही.
– अ‍ॅण्टीबायोटीक्स औषधांचा अयोग्य वापर रोखण्यासाठी औषधांच्या पाकिटांवर लाल रंगाची पट्टी असेल.
– औषधांच्या पाकिटावर Rx लिहिलेले असते, परंतू कधी तुम्ही विचार केला आहे का असे का असते, अशी औषधे डॉक्टरांच्या सल्लाने घ्यावी लागतात.
– अशा प्रकारची औषधे फक्त डॉक्टरांच्या सल्लाने दिली जातात ज्यांच्याकडे या औषधांचे लायसन्स आहे. हे लायसन्स नसणारे डॉक्टर किंवा मेडिकल स्टोरवाले ही औषधे विकत नाहीत.
– या प्रकारची औषधे तुम्ही थेट मेडिकल स्टोरमधून खरेदी करु शकत नाहीत. ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच विकली जातात, म्हणजेच डॉक्टरांची परवानगी असेल तरच ही औषधे दिली जातात.