जीव वाचवणारी शेवटची ‘ही’ गोळी देखील होतीय ‘फेल’, 10 रूग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रुग्णांना शेवटचा उपाय म्हणून दिली जाणारी एंटीबायोटिक्स कोलिस्टिन देखील आता बेअसर ठरत असून अनेक रुग्णांवर या गोळीने काहीही प्रभाव पडत नाही. जानेवारी 2016 ते ऑक्टोबर 2017 दरम्यान दिल्लीतील एम्सच्या ट्रॉमा सेंटरमधील २२ रुग्णांना या एंटीबायोटिक्सचा काहीही प्रभाव जाणवला नाही. मल्टी-ड्रग रेजिस्टेंट इन्फेक्शन या आजाराने पीडित असणाऱ्या या रुग्णांवर या गोळीने काहीही प्रभाव झाला नाही. या 22 पैकी 10जणांचा मृत्यू झाला असून तर 12 जणांचा जीव वाचला मात्र त्यांना जवळपास 23 दिवस रुग्णालयात राहावे लागले. एम्स, सीएमसी वेल्लोर आणि अमेरिकेच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रिवेंशनच्या वैज्ञानिकांनी केलेल्या तपासणीत समोर आले आहे.

1959 मध्ये करण्यात आली होती तयार कोलिस्टिन
कोलिस्टिनचा शोध हा 1959 मध्ये लावण्यात आला होता. निगेटिव्ह बॅक्टेरियासाठी हे औषध फार प्रभावशाली आहे. मात्र याचे काही साईडइफेक्ट्स देखील दिसून आले असून याचा किडनीवर परिणाम होतो, असे निदर्शनास आल्यानंतर याचा वापर पुन्हा कमी करण्यात आला. मात्र आता पुन्हा याचा वापर वाढला असून याचा प्रभाव मात्र काहीसा कमी झालेला दिसत आहे.

यामुळे बेअसर होत आहे एंटीबायोटिक्स
या औषधाचा वापर हा केवळ माणसांवरच निरुपयोगी ठरत नसून जनावरांवर देखील याचा काहीही फरक पडत नाही. यामुळे मल्टी-ड्रग रेजिस्टेंट या विकारामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक मृत पावत असून जगभरातील 10 भयानक विकारांमध्ये याचा समावेश केला जातो. त्यामुळे या एंटीबायोटिक्सच्या वापरावर नियंत्रण आणले नाही तर नागरिकांना न्यूमोनिया, टीबी यांसारखे भयानक आजार होऊन यावर उपचार करणे कठीण होईल.

स्वतःच डॉक्टर बनू नका
देशात आपण अनेकदा डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका अशा प्रकारची जागरूकता आपण केली तरी देखील अनेक नागरिक छोट्या आजारांवर डॉक्टरांचा सल्ला न घेता थेट औषधे घेतात. तर अनेकदा डॉक्टर देखील मोठ्या प्रमाणात या औषधांचा डोस देत असल्याने रुग्णांना यामुळे तोटा होतो. त्यामुळे एंटीबायॉटिकचा वापर करताना मोठ्या प्रमाणात विचार करून औषधांचे सेवन करावे.

Visit : Policenama.com

You might also like