Coronavirus : अँटीबॉडीजचं सुरक्षाकवच चालणार नाही, जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – जगर्भरता थैमान घातलेल्या कोरोनावर अँटीबॉडीजचं सुक्षाकवच मात करू शकत. या भ्रमामध्ये असाल तर वेळीच सावध रहा. कारणही तसंच आहे. एका तज्ञाने अँटीबॉडीजच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपिस्थत केले असून अजून यावर खूप संशोधन होण्याची आवश्यकता असल्याचे म्हंटले आहे. याबाबतचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे.

कोरोनाचा एकदा संसर्ग झाल्यावर निर्माण होणाऱ्या अँटीबॉडीज किती काळ टिकतात हे कळण्यासाठी अजून खूप संशोधन होण्याची गरज आहे. आणि या अँटीबॉडी पुन्हा एकदा संसर्ग झाल्यावर लढण्यासाठी सक्षम आहेत का हेसुद्धा पाहिलं पाहिजे, असे मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटल इथल्या डॉ. अनिता मॅथ्यू यांनी म्हंटल आहे.

त्या पुढे म्हणतात,अँटीबॉडीजचं आयुष्य आणि क्षमता सखोलपणे तपासत राहण्याची गरज असल्याचे संशोधक सांगत आहे. यात ज्यांना अलीकडेच कोरोनाचा संसर्ग झाला आहे अशा लोकांच्या मोठ्या प्रमाणावर चाचण्या केल्या पाहिजेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात (ICMR) ज्यांच्यावर उपचार झालेत त्यांच्यात दुसऱ्यांदा संसर्ग होतोय अथवा नाही यावर नजर ठेऊन आहे. त्यातील दुसऱ्यांदा संसर्ग झालेल्यांचा अभ्यासही इथले संशोधक करत आहेत. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की अँटीबॉडीजवर विसंबून चालणार नाही. ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन’ म्हणते त्याप्रमाणे, या अँटीबॉडीज म्हणजे काही इम्युनिटी पासपोर्ट नाहीत.अँटीबॉडीजविषयी कुठलेच फॅक्ट बेस्ड पुरावे समोर आलेले नाहीत. त्याऐवजी आपण आता लसीकरणाच्या टप्प्याबद्दल बोललं आणि समजून घेतलं पाहिजे.असंही डॉ. मॅथ्यू यांनी म्हंटल आहे.