‘कोरोना’ रूग्णांमध्ये 7 महिन्यांपर्यंत सक्रिय राहू शकते अँटीबॉडी, 300 पेक्षा जास्त रूग्णांचा केला अभ्यास

लिस्बन : कोरोना व्हायरस पीडितांमध्ये अँटीबॉडीबाबत नवीन अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये दावा करण्यात आला आहे की, कोरोनाशी लढणारी अँटीबॉडी एखाद्या रूग्णात लक्षणे दिसून लागल्यानंतर सुरूवातीच्या तीन आठवड्यात खुप वेगाने विकसित होते. ही शरीरात 7 महिन्यांपर्यंत सक्रिय राहू शकते. अँटीबॉडीची उत्पत्ती शरीराची प्रतिकारशक्ती या घातक व्हायरसला निष्प्रभ करण्यासाठी करते.

युरोपियन जर्नल ऑफ इम्युनोलॉजीमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, कोरोना संक्रमित पीडिताच्या शरीरात सहा महिन्यानंतर सुद्धा अँटीबॉडी आढळली आहे. हा निष्कर्ष 300 कोरोना पीडित आणि आजारातून बरे झालेल्या 198 लोकांवर करण्यात आलेल्या अभ्यासातून काढण्यात आला आहे. या निष्कर्षाच्या आधारावर शास्त्रज्ञांनी हेसुद्धा सांगितले की, महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये जास्त अँटीबॉडी निर्माण होते.

अँटीबॉडीच्या स्तराचा अभ्यास
पोर्तुगालची प्रमुख संस्था आयएमएमचे मार्क वेल्डहोएन यांच्या नेतृत्वात शास्त्रज्ञांनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले 300 पेक्षा जास्त कोरोना रूग्ण आणि आरोग्य कर्मचारी, अडीच हजार युनिव्हर्सिटी कर्मचार्‍यांसोबतच कोरोनातून बरे झालेले 198 लोकांच्या शरीरात अँटीबॉडीच्य स्तराचा अभ्यास केला.

या सहभार्गीपैकी सुमारे 90 टक्केंच्या शरीरात कोरोना झाल्यानंतर सात महिन्यानंतर सुद्धा अँटीबॉडी आढळून आली. वेल्डहोएन यांनी म्हटले, आपली प्रतिकारशक्ती कोविड-19 ला कारणीभूत सार्स-कोवी-2 व्हायरसला नुकसानकारक मानतात आणि त्यांच्या प्रतिक्रियेत अँटीबॉडीची उत्पत्ती करते.

You might also like