भारताच्या दबावासमोर झुकला एंटिगुआ, मेहुल चौक्सीचे नागरिकत्व ‘रद्द’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाब नॅशनल बँकेला चूना लावून देश सोडून पळालेल्या मेहूल चौक्सीला लवकरच भारतात आणले जाणार आहे. कारण त्याला नागरिकत्व देणाऱ्या एंटिगुआ देशाने त्याचे नागरिकत्व रद्द केले आहे. भारतातून पळून गेल्यावर मेहुल चौक्सीने एंटिगुआ या देशाचा सहारा घेतला होता. मात्र एंटिगुआ देशाला भारताच्या दबावासमोर झुकावे लागले आहे. एंटिगुआचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनी याबाबत महिती देताना सांगितले की, मेहुल चौक्सीचे नागरिकत्व रद्द करण्यात येणार आहे. भारताकडून बऱ्याच काळापासून याकारणाने दबाव आणला जात आहे. त्यामुळे मेहुल चौक्सीला भारतात परत आणण्याचा मार्ग खुला झाला आहे.

काय आहे प्रकरण –

पीएनबी घोटाळ्यात नीरव मोदी आणि मेहुल चौक्सी यांच्यावर १३ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. बँकेची लुबाडणूक या दोघांकडून करण्यात आली होती. त्यानंतर ते देशातील सुरक्षा व्यवस्थेला चकमा देऊन परदेशात गायब झाले होते. हे प्रकरण २०१८ मध्ये समोर आले होते. यावरुन विरोधी पक्षाकडून कायम मोदी सरकारला घेरण्यात आले होते.

भारताकडे सुपूर्त करणार –

एंटिगुआच्या पंतप्रधानांनी सांगितले की, मेहुल चौक्सीला येथील नागरिकत्व देण्यात आले होते. परंतू आता ते रद्द करण्यात आले आहे आणि त्याला भारतातकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. आम्ही अशा कोणत्याही व्यक्तीला आमच्या देशाचे नागरिकत्व देणार नाही ज्याच्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप आहेत.

ते पुढे असे ही म्हणाले की, आता एंटिगुआमध्ये मेहुल चौक्सीला कोणत्याही प्रकारचा कायदेशीर रस्ता उरलेला नाही. ज्यातून तो स्वताची सुटका करेल. त्याला भारताकडे सुपूर्त करणे आता पक्के झाले आहे.

एंटिगुआच्या पंतप्रधानांनी असे ही सांगतले की, मेहुल चौक्सीचे प्रकरण सध्या कोर्टात आहे. यासाठी आम्हाला सर्व प्रक्रियेचे पालन करावे लागेल. आम्ही भारत सरकारला यासंबंधित सर्व माहिती दिली आहे. मेहुल चौक्सीला सर्व कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करण्याचा वेळ देण्यात येईल. ज्यावेळी त्याच्याकडे कोणताही कायेदशीर पर्याय उरणार नाही, त्यावेळी त्याला भारताच्या ताब्यात देण्यात येईल.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक