Antilia Case | NIA चार्जशीटमध्ये माजी कमिश्नर परमबीर सिंह यांचे नाव नाही, मात्र सायबर एक्सपर्टच्या जबाबातून प्रश्न उपस्थित

मुंबई : Antilia Case | अँटीलिया केस (Antilia case) मध्ये एनआयएच्या चार्जशीट (NIA chargesheet) मध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त (Former Mumbai Police Commissioner) परमबीर सिंह (Parambir Singh) यांची कोणतीही स्पष्ट भूमिका नाही, परंतु चार्जशीटमध्ये एका सायबर एक्सपर्ट (cyber expert) च्या जबाबातून खुलासा झाला आहे की, परमबीर यांनी बनावट जैश उल हिंद (Jaish-ul-Hind) च्या धमकीचा टेलीग्राफ मेसेज (telegraph message) बनवण्यासाठी सायबर एक्सपर्टला 5 लाख रुपये (Rs 5 lakh) दिले.

अँटीलिया केसमध्ये एनआयएच्या 10 हजार पानांच्या चार्जशीटमध्ये एका सायबर एक्सपर्टचा जबाब जोडला आहे जो या केसमध्ये परमबीर सिंह यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करतो की, परमबीर सिंह हे तपासाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते का. हा तोच सायबर एक्सपर्ट आहे ज्याने दहशतवादी संघटना ’जैश उल हिंद’ च्या नावाने घटनेची जबाबदारी घेणार्‍या संघटनेच्या टेलीग्राम आयडीवरून संबंधित आपल्या रिपोर्टमध्ये छेडछाड केली होती. म्हणजे रिपोर्टमध्ये धमकीचे पोस्टर त्याने इन्सर्ट केले होते.

Fire in Indonesia | इंडोनेशियाच्या तुरुंगात भीषण आग; 40 कैदी मृत्युमुखी

यासाठी परमबीर सिंह यांनी सायबर एक्सपर्टला आपल्या कार्यालयातच 5 लाख रुपये रोख दिले होते. तर एक्सपर्टला पैसे घ्यायचे नव्हते. त्याचा हा सुद्धा जबाब होता की, हा अति गोपनीय रिपोर्ट होता जो त्याने मुंबई पोलीस आयुक्तांच्या सांगण्यावरून बनवला होता आणि त्यांनी सांगितले होते की हा अतिशय गोपनीय रिपोर्ट आहे आणि दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल यावर तपास करत आहे.

तरीही दुसर्‍या दिवशीच रिपोर्ट लीक झाल्याने मी हैराण झालो होतो. एक्सपर्टने हे सुद्धा सांगितले की नंतर दिल्ली पोलिसांनी आपल्या तपासात ज्या टेलीग्राम आयडीचा उल्लेख केला आहे तो आयडी सायबर एक्सपर्टच्या आयडीपेक्षा वेगळा होता.

एनआयएला सुरूवातीपासूनच जैश-उल-हिंदच्या कथित जबाबदारी घेण्याच्या बाबतीत माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह सहभागी असल्याचा संशय होता. सायबर तज्ज्ञाने 5 ऑगस्टला एनआयएच्या समोर नोंदलेल्या आपल्या जबाबात म्हटले आहे की, त्याने परमबीर सिंह यांच्या विनंतीवरून रिपोर्ट बनवला. हा सायबर एक्सपर्ट संपूर्ण देशात आयपीएस अधिकार्‍यांना सायबर प्रशिक्षण देतो आणि सायबर दहशतवादावर लक्ष ठेवण्यात विविध गुप्तचर एजन्सीला मदत करतो.

9 मार्च 2021 ला एका प्रशिक्षणासाठी सायबर एक्सपर्टने सीपी मुंबई कार्यालयाचा दौरा केला होता त्याच
बैठकीत त्याने परमबीर सिंह यांना टेलीग्राम चॅनलवर ’जैश-उल-हिंद’ चा 27.02.2021 चा जबाबदारी
घेतल्याचा दावा करत एक पोस्ट दाखवली होती आणि म्हटले होते की, मी सुद्धा अशाप्रकारचा चॅनल बनवू
शकतो आणि मेसेजमध्ये छेडछाड करू शकतो. आणि दिल्लीमध्ये इस्त्रायल दुतावासाच्या बाहेरील स्फोटाच्या
तपासात मी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला सहकार्य सुद्धा केले आहे.

यानंतर परमबीर सिंह यांनी मला अँटिलिया धमकीची जबाबदारी घेणारा मेसेज टेलीग्रामवर ’जैश-उल-हिंद’च्या
पेजवर दिसणार्‍या पोस्टरवर टाकण्यास सांगितले. सोबतच त्यांनी म्हटले, हे तपासात सहकार्यासाठी आवश्यक
आहे परंतु दुसर्‍या दिवशी हे मीडियात आले.

हे देखील वाचा

‘गणेशोत्सव’ – एक ‘कौशल्य कार्यशाळा’ !

Rain in Maharashtra | मुंबई अन् पुण्यासह ‘या’ 11 जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्हयाला रेड अलर्ट

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Antilia Case | mumbai antilia case nia chargesheet parambir singh not named questions raised cyber experts report

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update