‘लैंगिक’ अत्याचाराच्या आरोपामुळे अखेर अनु मलिक यांना सोडावा लागणार ‘इंडियन आयडॉल’ शो ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘मी टू’ चळवळीत लैंगिक शोषणाचे आरोप झालेले संगीतकार अनू मलिक कोणत्यानाकोणत्या कारणावरुन सारखे अडचणीत येत आहेत. काही दिवसांपासून ते सिंगिंग रिअलिटी शो ‘इंडियन आयडॉलच्या ११’ व्या सीझनमध्ये परिक्षक म्हणून दिसत आहे. आता ते हा शो मध्येच सोडून जात असल्याची चर्चा सगळीकडे पसरली आहे. या कार्यक्रमाच्या निर्मात्यांकडून किंवा अनु मलिक यांच्याकडून याबाबतची कोणतीच माहिती स्पष्ट झाली नाही. लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे ते हा शो सोडणार असल्याची चर्चा सर्वत्र पसरली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, जर अनु मलिक यांनी हा शो सोडला तर त्यांच्या जागी कोण येणार असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. इंडियन आयडॉल ११ मध्ये अनु मलिक परिक्षकाचे काम पाहत होते. हा शो सोनी टीव्हीवर प्रसारित केला जातो. असे समजले आहे की, सोनी टीव्हीला राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस मिळाली आहे. ही नोटीस महिला आयोगाच्या ऑफिशिअल ट्विटरवरुन शेअर करण्यात आली आहे.

या नोटीसमध्ये गायिका सोना पात्राच्या ट्विटचा उल्लेखही करण्यात आला आहे. त्याचबरोबर चॅनेलकडून अनु मलिक यांच्यावर केलेल्या कारवाईचे स्पष्टीकरण मागिलते आहे. २०१८ मध्ये सोना मोहपात्राने पहिल्यांदा अनु मलिक यांच्यावर लैंगिक शोषणचा आरोप लावला होता. त्यावेळी त्यांना ‘इंडियन आयडॉल १०’ शो सोडावा लागला होता. त्यांनतर गायिका नेहा भसिन आणि श्वेता पंडित यांनी सोनाला पाठिंबा देऊन अनु मलिक यांच्यावर अनेक आरोप लावले होते.

आता पुन्हा एकदा अनु मलिक यांनी सोनी टीव्हीनं 11 व्या सीझनमध्ये परिक्षक म्हणून साईन केल्यानंतर सोना पात्रा यांनी अनु मलिक यांच्याविरोधात आवाज उठविला आहे. काही दिवसांपुर्वीच तनुश्री दत्ताने सुद्धा सोनाला पाठिंबा दिला होता. मात्र काही दिवसांपुर्वीच अनु मलिक यांनी त्यांच्यावर लावलेला आरोप चुकीचे असल्याची माहिती दिली आहे.

Visit : Policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like