‘भजन गायक’ अनुप जलोटांना 46 वर्षांनंतर मिळाली BA ची डिग्री ! शुभेच्छांनी भरला कमेंट बॉक्स

पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध भजन गायक आणि बिग बॉस स्पर्धक अनुप जलोटा (Anup Jalota) यांना 46 वर्षांनंतर लखनऊ युनिव्हर्सिटीतून बीएची डिग्री मिळाली आहे. अनुप जलोटा यांनी 1974 मध्ये इथूनच ग्रॅज्युएशन केलं होतं. परंतु ते डिग्री घेऊ शकले नव्हते. अशात बुधवारी सकाळी कुलपती कार्यायातील कुलगुरुंकडून त्यांना ही डिग्री देण्यात आली. लखनऊ विद्यापीठाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. अशात शताब्दी उत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अनुप यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.

डिग्री घेतल्यानंतर काय म्हणाले अनुप जलोटा ?

मीडिया रिपोर्टनुसार, 46 वर्षांनंतर आपली बीएची डिग्री घेतल्यानंतर अनुप जलोटा म्हणाले, त्यांना असं वाटत हे की, ते दुसऱ्यांदा पद्मश्रीनं सन्मानित झाले आहेत. त्यांनी याचा फोटोही सोशलवर शेअर केला आहे. अनेकांनी त्यांच्या या पोस्टवर कमेंटचा पाऊस पाडला आहे.

अनुप यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर लवकरच ते एका रॅप साँगमधून सिंगर बप्पी लहरी आणि रॅपर हनी सिंग यांना टक्कर देताना दिसणार आहेत. त्यांचा आगामी सिनेमा वो मेरी स्टुडेंट है मधील हे गाणं आहे. याची शूटिंग जवळपास पूर्ण झाली आहे. या सिनेमात त्यांच्यासोबत त्यांची स्टुडेंट जसलीन मथारू हीदेखील दिसणार आहे. अलीकडेच जसलीननं तिच्या इंस्टावरून शूटिंगमधील काही फोटो शेअर केले होते, ज्यात दोघंही ग्लॅमरस लुकमध्ये दिसले होते.