‘द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपटाचा ट्रेलर युट्युब वरून ‘गायब’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्य भूमिका साकारणारे अनुपम खेर यांचा ‘द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा चित्रपट राजकीय वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असतांनाच चित्रपटाचा ट्रेलर युट्युब वरून ‘गायब’ असल्याचा दावा अनुपम खेर यांनी केला आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे तत्कालीन मीडिया सल्लागार संजय बारू यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकावर आधारित ‘द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अनुपम खेर मुख्य भूमिका साकारणार असून हा चित्रपट सध्या राजकीय वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दरम्यान या चित्रपटाचा ट्रेलर युट्युब वरून ‘गायब’ असल्याचा दावा अनुपम खेर यांनी केला आहे.

विशेष म्हणजे  ‘डियर युट्यूब, ‘द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’चा ट्रेलर ट्रेंडमध्ये आहे. पण अनेक चाहत्यांची हा ट्रेलर यु ट्यूबवर दिसत नसल्याची तक्रार नोंदवली आहे. मला फोन व मॅसेज येत आहेत की, देशाच्या अनेक भागात युट्यूबवर द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर ट्रेलर सर्च केल्यानंतर काहीही दिसत नाही किंवा ‘द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’चा ट्रेलर ५० व्या स्थानावर आहे. आम्ही नंबर १ वर ट्रेंड करत आहोत. कृपया मदत करा, असे ट्विट अनुपम खेर यांनी केले आहे. इतकेच नव्हे तर या ट्वीटसोबत त्यांनी चाहत्यांनी पाठवलेल्या मॅसेजचे स्क्रिनशॉटही शेअर केले आहेत.

विशेष म्हणजे ‘द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाल्या नंतर तूर्तास काँग्रेसने या चित्रपटाला जोरदार विरोध चालवला. इतकेच नव्हे तर या ट्रेलरनंतर भाजपा विरूद्ध काँग्रेस यांच्यात नवा वाद रंगला असून हा चित्रपट माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेसची बदनामी करणारा असल्याचा दावा, काँग्रेसने केला आहे. मात्र ‘द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून आत्तापर्यंत कोट्यवधी लोकांनी तो पाहिला असून, येत्या ११ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

You might also like