अनुपम खेरला ‘नॉटी मुलगा’ म्हणायचे अमरीश पुरी, स्वत:च केला खुलासा !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूडमधील दिग्गज स्टार आणि एक खतरनाक विलेन अमरीश पुरी यांची नुकतीच(दि 22 जून 2020) बर्थ अॅनिव्हर्सरी झाली. 15 वर्षांपूर्वी त्यांनी जगाचा निरोप घेतला. आपल्या शानदार अभिनयानं आजही ते चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत. अमरीश पुरी यांची पर्सनॅलिटीच अशी होती की, जेव्हा ते पडद्यावर हिरो सोबतच दिसायचे तेव्हा त्यांच्या समोर मोठ्यात मोठा स्टारही फिका वाटत आहेत. अभिनेते अनुपम खेर यांनी नकुतीच एक पोस्ट शेअर करत अमरीश पुरी यांच्या काही आठवणी सांगितल्या आहेत.

अनुपम खेर यांनी नुकताच त्यांच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. एका मासिकाचा हा कव्हर फोटो आहे. यावर अमरीश पुरी आणि अनुपम खेर दिसत आहेत. काही तासातच हा फोटो सोशलवर व्हायरल झाला आहे.

‘मला अमरीश पुरींची आठवण येते’

फोटो शेअर करताना अनुपम खेर म्हणाले, “मला अमरीश पुरींची आठवण येते. ते उत्तम माणूस होते ज्यांच्यासोबत मैत्री करण्याची संधी मला मिळाली होती. ते खूप शांत आणि दयाळू होते. एखाद्या मुलाप्रमाणच ते निष्माण होते. असं असतानाही त्यांनी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सिनेमात सर्वात खतरनाक विलन साकारला होता. ते खूप प्रोफेशनल कलाकार होते. वक्तशीर आणि शिस्तबद्ध.”

‘अमरीश जी तुस्सी ग्रेट हो’

जुन्या आठवणी सांगत अनुपम खेर म्हणाले, “ते नेहमीच मला म्हणत असत. यार तू खूपच नॉटी मुलगा आहेस. मला असं मुलगा म्हणून खूप कमी लोकांनी हाक मारली होती. हे खूप छान वाटायचं. कारण मीही त्यांना रिप्लाय करायचो. अमरीश जी तुस्सी ग्रेट हो. आणि ते एखाद्या मुलाप्रमाणं हसत असे. अमरीश जी तुम्ही कायमच ग्रेट रहाल.”

अनुपम यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर एनबीसीवर येणारा ड्रामा न्यू एम्स्टर्डम मध्ये ते डॉ विजय कपूरची भूमिका साकारत आहेत. एमएक्स प्लेअरवरील रक्तांचल या वेब सीरिजमध्येही त्यांनी काम केलं आहे.