जेव्हा 33 वर्षांच्या अनुपम खेर यांनी साकारली होती अनिल-ऋषी कपूर यांच्या आजोबांची भूमिका !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार अनुपम खेर यांना इंडस्ट्रीत 36 वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास निमित्तानं आपण अनुपम यांच्या विजय सिनेमातील त्या रोलबद्दल जाणून घेणार आहोत ज्यात त्यांनी 33 व्या वर्षांच्या एका म्हाताऱ्या आजोबाचा रोल साकारला होता. त्यांची अॅक्टींग एवढी शानदार होती की, त्या म्हाताऱ्या बापामागे असलेले यंग अनुपम खेर कोणालाच दिसले नाहीत.

1988 साली आलेल्या यश चोपडा यांच्या विजय या सिनेमात अनुपम यांनी हेमा मालिनी यांच्या वडिलांचा आणि अनिल कपूर यांच्या आजोबांचा रोल साकारला होता. आधी हा रोल दिलीप कुमार साकारणार होते परंतु नंतर मात्र हा रोल अनुपम खेर यांनी साकाराला. या सिनेमात त्यांच्याहून वयाने मोठे असणाऱ्या राजेश खन्ना यांनी अनुपम यांच्या जावयाचा रोल साकारला होता.

या सिनेमात हेमा मालिनी यांनी अनुपमची मुलगी आणि ऋषी-अनिल यांनी मुलांची भूमिका साकारली होती. सिनेमात अनुपम यांना पाहून क्वचितच कोणाला त्यांच्या वयाचाा अंदाज लावायला जमेल. काही त्यांच्या मेकअपची कमाल होती आणि काही त्यांच्या अभिनयाची.

मिळाला होता बेस्ट सपोर्टींग अॅक्टरचा अवॉर्ड

अनुपम यांच्या या बाप आणि आजोबाच्या अॅक्टींगनं लोकांचं मन जिंकलं होतं. सिनेमा जरी चालला नाही तरी अनुपम यांच्या अभिनयाचं खूपच कौतुक झालं. यासाठी त्यांना बेस्ट सपोर्टींग अॅक्टरचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता.