home page top 1

अनुपम खेर स्वतःच मागत आहेत वाढदिवसाच्या शुभेच्छा 

मुंबई : वृत्तसंस्था – ‘सारांश’ चित्रपटातून आपल्या अभिनयाला सुरुवात करणारे जेष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा आज वाढदिवस अनुपम खेर आज ६४ वर्षाचे झाले आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारे अनुपम खेर यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी इन्स्टाग्राम अकाउंटवर एक भन्नाट पोस्ट टाकून एक व्हिडीओ शेअर केला आहे.

‘आज मी भारतात माझा वाढदिवस साजरा करतोय. उद्या न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. चला, मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या !’ अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.

अनुपम खेर यांनी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ‘सारांश’ सिनेमा पासून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या अनुपम यांनी आजवर शेकडो चित्रपटात काम केलं आहे. आपल्या अभिनयाचा हा दीर्घ प्रवास त्यांनी या एका मिनिटांच्या व्हिडिओद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचं बालपण, जीवनाकडं बघण्याचा दृष्टिकोनआणि त्यांच्या स्वभावाच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

माझ्याकडून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा ! या एका मिनिटाच्या क्लिपमधून मी माझा प्रवास तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझ्या जीवनात केवळ मीच बदल घडवू शकतो. दुसरा कुणी ते करू शकत नाही,’ असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या व्हिडिओला चाहते सुद्धा भरभरून प्रतिसाद देत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे.

करण जोहरच्या ‘या’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

Loading...
You might also like