Video : अनुपम खेर यांनी शेअर केला ‘देसी हॅरी पॉटर’चा व्हिडीओ ! सोशलवर तुफान व्हायरल

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार अनुपम खेर (Anupam Kher) सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. ते सतत काही ना काही शेअर करत असतात. त्यांनी शेअर केलेल्या पोस्ट अनेकदा चर्चेत असतात. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे जो पाहून तुम्ही हसण्यासाठी भाग पडाल.

देसी हॅरी पॉटरचा व्हिडीओ व्हायरल

अनुपम यांनी इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात दिसत आहे की, एक व्यक्ती स्कुटीवरून कुठे तरी चालला आहे. त्याच्या स्कुटीला मागील बाजूस मोठा झाडू दिसत आहे ज्यावर तो बसला आहे. अनुपम यांनी त्याला देसी हॅरी पॉटर म्हटलं आहे.

 

 

 

 

 

 

 

अनुपम यांचा हा व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी म्हटलं आहे की, हॅर पॉटर आता फेमस झाला आहे. अनेकांना हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हसू आवरलं नाही. काहींनी लाफींग इमोजी वापरत यावर कमेंट केल्या आहेत.

अनुपम यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर एनबीसीवर येणारा ड्रामा न्यू एम्स्टर्डम मध्ये त्यांनी डॉ विजय कपूरची भूमिका साकारली आहे. वन डे : जस्टीस डिलीवर्ड मध्ये ते शेवटचे दिसले होते. या सिनेमात त्यांनी न्यायाधिशाची भूमिका साकारली होती.