अनुपम खेर यांनी शेअर केले तारुण्यातील फोटो ! म्हणाले- ‘तुम्ही कुणाकुणाला ओळखता ?’

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार अनुपम खेर (Anupam Kher) सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. ते सतत काही ना काही शेअर करत असतात. त्यांनी शेअर केलेल्या पोस्ट अनेकदा चर्चेतही येतात. नुकतेच त्यांनी काही थ्रोबॅक शेअर केले आहेत. हे त्यांच्या तारुण्यातील काही फोटोत आहेत. या फोटोत त्यांच्या व्यतिरीक्त इतरही दिग्गज स्टार्स आहेत. त्यांनी हे फोटो शेअर करताना चाहत्यांना टास्क दिलं आहे की, त्यांनी यातील स्टार्स कोणते आहेत ते ओळखावं.

अनुपम खेर यांनी ट्विटरवरून काही फोटो शेअर केले आहेत. यासोबत त्यांनी लिहिलं की, हे जुम्मा-चुम्मा च्या रिहर्सलचे फोटो आहेत. हा एक सोल्ड आऊट शो राहिला होता. अमिताभ बच्चन जी नेहमी प्रमाणे या शोमध्ये चर्चेचा विषय ठरले. सुपरस्टार रजनीकांत, श्रीदेवी आणि इतर कलाकारांसोबत वेळ घालवायची संधी मिळाली. चला पाहूया तुम्ही या पैकी किती लोकांना ओळखता. हे फोटो मला मिनाल त्रिवेदी नावाच्या फ्रेंडनं पाठवले आहेत.

अनुपम यांची ही पोस्ट सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी यातील कलाकार कोण आहेत ते ओळखण्याचा प्रयत्न केला आहे. काही चाहत्यांनी या ट्विटला रिट्विट करत शेअरही केलं आहे.

अनुपम यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर एनबीसीवर येणारा ड्रामा न्यू एम्स्टर्डम मध्ये त्यांनी डॉ विजय कपूरची भूमिका साकारली आहे. वन डे : जस्टीस डिलीवर्ड मध्ये ते शेवटचे दिसले होते. या सिनेमात त्यांनी न्यायाधिशाची भूमिका साकारली होती.