‘द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ विरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली

मुंबई : वृत्तसंस्था – सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयाने ‘द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर विरोधातील याचिका फेटाळून लावली आहे. ही याचिका फेटाळून लावताना याचिकाकर्त्यांनी ती जनहित याचिकेच्या स्वरुपात दाखल करुन सर्वप्रथम खंडपीठासमोर सादर करावी अशी मागणी केली.

‘द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून अनेक कारणांनी वादात सापडला होता. या चित्रपटावर आणि चित्रपटात प्रमुख भूमिका असलेले अनुपम खेर यांच्यावर अनेक जणांनी टीका केल्या होत्या दिल्लीस्थित एका फॅशन डिझायनरने या चित्रपटाविरोधात याचिका दाखल करत त्याचा ट्रेलर प्रसारित करणं थांबवण्यात यावं अशी मागणी केली होती. या चित्रपटातून पंतप्रधान या संविधानिक पदाची प्रतिमा मलिन होत असल्याचे सांगत याचिका दाखल दाखल केली होती .तसेच या चित्रपटात चुकीची माहिती दाखवण्यात आली असून ट्रेलरमधून सिनेमॅटोग्राफी कायद्याच्या नियम ३८ चं उल्लंघन होत असल्याचंही या याचिकेत म्हटलं गेलं होतं.

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे तत्कालीन माध्यम सल्लागार संजय बारू लिखित पुस्तकावर या चित्रपटाचं कथानक आधारित असून, जे सत्य आहे तेच मांडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं मत अभिनेते अनुपम खेर यांनी फार आधीच मांडलं होतं.