सुप्रसिद्ध अभिनेता अनुपम खेरची ‘आत्मकथा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दोनवेळा राष्ट्रीय पुरस्कार आणि आठ वेळा चित्रपट पुरस्कार प्राप्त करणारे सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर  हे असे खास व्यक्ती आहेत ज्यांना बॉलिवूडपासून सगळे ओळखतात. त्यांनी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांचा काम करण्याचा अंदाज लोकांना खूप पसंत आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार असे समजले आहे की, अभिनेता अनुपम खेर अभिनयानंतर सध्या आपली आत्मकथा लिहित आहे. या आत्मकथेच्या पुस्तकाचे प्रकाशन ऑगस्ट महिन्यात होणार आहे. या पुस्तकाचे नाव ‘लेसन्स लाइफ टॉट मी अननोइंगली’ आहे.

आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनूसार, पुस्तकाचे प्रकाशक पेंगुइन रैंडम हाउस यांचे म्हणणे आहे की, हे पुस्तक एक असाधारण आणि मनोरंजक असेल . यामध्ये अनुपम खेर यांनी आपल्या जीवनाची पुर्ण कथा लिहली आहे. त्याचबरोबर चित्रपट दुनिया आणि चित्रपटातील पडद्यामागील कथाही लिहली आहे. अनुपम खैर यांनी विभिन्न भाषांमधील ५३० चित्रपटांमध्ये काम केले आहे.

भारतीय चित्रपट सृष्टीतल्या सगळ्यात प्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये सामिल असमारे अनुपम खेर यांनी अनेक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिकेत काम केले आहे. प्रत्येक चित्रपटात त्यांनी छानप्रकारे भूमिका साकारली असून त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले आहे. ते एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात ‘सारांश’ आणि ‘डैडी’ चित्रपटातून केली होती.

आरोग्यविषयक वृत्त- 

रक्ताची गाठही ठरू शकते मृत्यूचे कारण ; वेळीच व्हा सावध

इंटरनेटचा अतिरेकी वापर करतो मेंदूच्या ‘या’ क्षमतांवर परिणाम

धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग

झोपेत आलेल्या हार्ट अ‍ॅटकची माहिती देणार ‘हे’ नवे तंत्रज्ञान