‘या’ व्यावसायिकानं खरेदी केला भारतातील सर्वात महागडा फ्लॅट, किंमत 100 कोटी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपले एक सुंदर घर असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण त्या घराची किंमत 100 कोटी असेल तर. होय, आपल्या देशातील एका श्रीमंत उद्योगपतीने मुंबईत 100 कोटी रूपयांचे दोन फ्लॅट खरेदी केले आहेत. हे फ्लॅट्स मुंबईच्या पॉश करमायकल रोडवर आहेत.

या उद्योगपतीचे नाव अनुराग जैन आहे. अनुराग जैन बजाज कंपनीचे मालक राहुल बजाज यांचे पुतणे आहेत. सोबतच त्यांची स्वत:ची ऑटो पार्ट कंपनी आहे.

अनुराग जैन यांनी मुंबईच्या करमायकल रोडवर करमायकल रेसीडेन्सीजमध्ये दोन फ्लॅट्स खरेदी केले आहेत. हे दोन फ्लॅट एकुण 6371 वर्ग फुटाचे आहेत. जैन यांनी 1,56,961 रुपये प्रति वर्ग फुट दराने किंमत मोजली आहे.

जैन यांच्या या फ्लॅट्सची मुळे किंमत 46.43 कोटी होती. परंतु, त्यांना दुप्पट रक्कम भरावी लागली कारण रजिस्ट्रेशन आणि स्टँप ड्यूटी मिळून ही किंमत 100 कोटी रूपये झाली.

रजिस्ट्रेशनची किंमत 1.56 लाख रुपये प्रति वर्ग फुट होती आणि पाच कोटी रूपये स्टँप ड्यूटीचे लागले. हे दोन फ्लॅट्स खरेदी करण्यासोबत त्यांना अपार्टमेंटमध्ये 8 पार्किंग सुद्धा मिळाल्या आहेत.

अनुराग जैन अँड्यूरन्स टेक्नॉलॉजीसचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांची कंपनी भारत आणि युरोपमध्ये दोन चाकी आणि तीन चाकी वाहनांचे ऑटो-पार्ट बनवते आणि सप्लाय करते.

करमायकल रेसीडेन्सीज 21 मजल्याची इमारत आहे. यामध्ये केवळ 28 फ्लॅट्स आहेत. एका फ्लोअरवर दोनच फ्लॅट बनवले आहेत. जेणेकरून राहणारांना भरपूर जागा मिळावी. फ्लॅट्समध्ये 2000 वर्ग फुटाची जागा आहे. या इमारतीचे सध्या बांधकाम सुरू आहे.

रेसीडेन्टला दोन फ्लॅट्स एकत्र करता येऊ शकतात. प्रत्येक फ्लॅटमधून एकीकडे समुद्र आणि दुसरीकडे शहराचे सुंदर विहंगम दृश्य दिसते.

इमारतीत सोलर पॅनल, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सीवरेज ट्रीटमेंट प्लान्ट, यासारख्या सुविधासुद्धा आहेत. याशिवाय टेरेसवर मोठे गार्डन आणि इन्फिनिटी पूल सुद्धा आहे.