CAA आणि PM मोदींवर केलेली टीका भोवली, अनुराग कश्यपचे ट्विटर फॉलोअर्स 4 लाखानं घटले

पोलीसनामा ऑनलाईन टीम : दिग्गज चित्रपट निर्माते-दिग्दर्शक अनुराग कश्यप गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर CAA आणि NRC ला तीव्र विरोध दर्शवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरूद्ध खुलेआम बोलत असून त्यांच्याबद्दल वादग्रस्त विधानही करत आहेत. आता अनुरागने आपल्या नवीन ट्विटमध्ये मायक्रोब्लॉगिंग साइटलाही वेढले आहे. अनुरागने ट्विटरवर आपले फॉलोअर्स कमी केल्याचा आरोप केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनुरागचे फॉलोवर ५ लाखांवरून घसरून अवघ्या ७६ हजारांवर गेले आहेत. यानंतर अनुरागने ट्विटरवर तक्रार केली की, “ट्विटर इंडियाने माझे फॉलोअर कमी केले आहेत.” अनुरागने एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे ज्यात त्याच्या फॉलोअर्सची संख्या बर्‍यापैकी कमी आहे. दरम्यान, अनुराग कश्यप गँग्स ऑफ वासेपुर सारख्या अनेक हिट चित्रपटांचा निर्माता आहेत.

दरम्यान, अनुराग कश्यपने अलीकडेच ट्विटरवर पुनरागमन केले असल्याची समजते. सुमारे ४ महिन्यांपूर्वी त्यांनी ट्विटर सोडताना म्हंटले होते कि, ‘जर मी भीतीशिवाय माझे विचार बोलू शकत नाही, तर मी न बोलणेच चांगले आहे. सर्वांना निरोप.’ अलीकडेच ट्विटरवर परत येत अनुरागने लिहिले, “पुरे झाले … आता शांत बसू शकत नाही.” ते म्हणाले, “हे हुकूमशाही सरकार आहे … मला खूप राग येतो की, जे लोक बदल घडवून आणू शकतात ते शांत बसले आहेत.” अनुराग कश्यप यांनी एकापाठोपाठ एक अशी अनेक ट्वीट पुन्हा ट्विट केली. ज्यात देशातील घडामोडींबद्दल व्हिडिओ पोस्ट केले गेले आहेत.”

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/