CAA : अनुराग कश्यपची PM मोदींवर ‘जहरी’ टीका, म्हणाला…

नवी दिल्ली : वृत्त संस्था – बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपने नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अतिशय जहरी टीका केली आहे. कश्यप यांनी पंतप्रधानांना मुका व बहिरा असे संबोधले आहे. त्यांच्या या टीकेवरून वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये अनुराग कश्यपने म्हटले आहे की, आपले मुख्य सेवक, आपले पंतप्रधान, जनतेचे मुख्य नोकर बहिरे व मुके आहेत आणि भावनांच्या पलिकडील आहेत. ते फक्त नौटंकी आहेत, जे भाषण देऊ शकतात. बाकी सगळे त्यांच्या अवाक्याबाहेर आहे. त्यांना ना दिसत, ना ऐकू येत. आता ते नवीन नवीन खोटे शिकण्यात व्यग्र आहेत.

देशात सध्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात संतापाचे वातावरण असून ठिकठिकाणी उग्र आंदोलने सुरू आहेत. काही ठिकाणी मोठा हिंसाचारही होत आहे. सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. विशेष म्हणजे या आंदोलनांमध्ये समाजातील सर्व वर्गातील लोक सहभागी होत आहेत. यामध्ये बॉलिवुडसुद्धा मागे नाही. मुंबईत झालेल्या आंदोलनात बॉलिवुडमधील अनेक कलाकार सहभागी झाले होते. परंतु, त्यांनी जाहिरपणे तसेच सोशल मीडियावर अतिशय सावध प्रतिक्रिया दिल्या आहेत. परंतु, कश्यप यांनी याप्रकरणावरून थेट पंतप्रधानांवर जहरी टीका केली आहे.

अनुराग कश्यप हे सातत्याने मोदी सरकारवर आरोप करत असतात. त्यांच्या ट्विटवर अनेकदा संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत असतात. यापूर्वीचेही त्यांचे काही ट्विट खुप व्हायरल झाले होते. तसेच त्यांनी यापुर्वीही मोदी सरकारवर अरोप केले आहेत. सरकार समर्थक दंगे सुरु करतात आणि त्यानंतर जनतेवर पोलीस तुटून पडतात. देशातील सद्यस्थितीला भाजप सरकार जबाबदार असून, चिघळलेल्या परिस्थितीमागे भाजपचाच हात आहे, असा आरोपही यापूर्वी कश्यप यांनी केला होता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/