‘रवी किशन गांजाचे झुरके मारायचा’

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यभरात कोरोनाचा कहर सुरु असताना बॉलीवूडमध्ये एकमेकांवर आरोप करण्यात येत आहेत. बॉलिवूडमध्ये ड्रग्सची समस्या फार गंभीर आहे. त्याप्रकरणी चौकशी व्हावी; अशी मागणी खासदार रवी किशन यांनी लोकसभेत केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत एकेकाळी रवी किशन स्वत: गांजाचे झुरके मारायचे, असा आरोप दिग्दर्शक अनुराग कश्यपने केला.

खासदार रवी किशन यांनी लोकसभेत ड्रग्सच्या मुद्द्यावर भाष्य केले होते. ड्रग्सचे सेवन आणि तस्करी हा खूप गंभीर विषय आहे. या कटात आपल्या शेजारील देशसुद्धा सामील आहेत. पाकिस्तान आणि चीनमधून देशात ड्रग्स येते. ड्रग्सचा फटका चित्रपटसृष्टीलाही बसल्याचे ते म्हणाले होते. याविषयी अनुराग कश्यपने रवी किशन यांच्यावर ड्रग्स घेतल्याचा आरोप केला. मुक्काबाज या चित्रपटात रवी किशनने काम केले होते. जय शिव शंकर, जय शिवशंभू असे म्हणत त्याची सकाळ होते. त्याने एकेकाळी गांजाचे झुरके मारले आहेत. हे सर्वांना माहित आहे. रवी किशनच्या या सवयीबद्दल माहित नसलेला कोणीच नाही. त्याने कदाचित आता ती सवय सोडली असेल. पण तुम्ही त्याचा ड्रग्समध्ये समावेश करणार का? रवी चुकीचा आहे की बरोबर हे मी बोलत नाहीये, असे अनुराग म्हणाला. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड पुटण्याची शक्यता आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like