अनुराग कश्यपच्या मुलीचा मोठा खुलासा, म्हणाली – ‘माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले होते’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची मुलगी आलिया कश्यप या दिवसांत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी ती आपल्या बोल्ड फोटोमुळे जोरदार ट्रोल झाली होती. ज्यानंतर ती खूप घाबरली होती. तिने म्हंटले कि, ती आपल्या आयुष्यात एवढी कधीच घाबरली नव्हती, जितकी भीती तिला इंस्टावर पोस्ट केलेल्या बोल्ड फोटोवरील कमेंट्स वाचल्यानंतर वाटली. तिने त्या कमेंट्सचा स्किनशॉट देखील सोशल मीडियावर शेअर केला. त्यांनतर आता आलियाने जुनी आठवणही शेअर केली आहे, जेव्हा तिचा लैगिंक छळ करण्यात आला होता. आलियाने बलात्कारी मानसिकतेच्या लोकांना लक्ष्य केले असून तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आलियाने इंस्टाग्रामवर पोस्टमध्ये लिहिले कि, गेले काही आठवडे माझे मानसिक आरोग्यसाठी फार कठीण गेले. जेव्हापासून मी लिंगरीमध्ये माझे फोटो शेअर केले आहेत तेव्हापासून मला खूप अश्लील कमेंट्स येत आहे. मी कधीही इतकी घाबरलेली नव्हते. इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करण्याचा विचारही माझ्या मनात आला. आम्ही अशा देशात राहतो जिथे एखाद्या महिलेच्या लैंगिक छळानंतर लोक मेणबत्ती मोर्च करतात पण जेव्हा ती जिवंत असते तेव्हा कोणीही तिचे संरक्षण करत नाही. सत्य तर हे आहे की, भारतीय महिला लैंगिक छळासोबतच मोठ्या होतात. मी अश्याच घाणेरड्या कमेंट्स वाचून मोठी झाले आहे. इतकेच नाही तर अल्पवयीन वयात एका मध्यमवयीन व्यक्तीने माझा लैंगिक छळही केला होता.

ट्रोल्सला फटकारले :
अश्लील आणि घाणेरड्या कमेंट्सचा स्क्रीनशॉट शेअर करत तिने म्हटले की – हे काही लोक अश्याच मानसिकतेचे आहेत जे मला फॉलो करतात, माझे फोटो पहातात आणि त्यानंतर माझा छळ देखील करतात. जर मी पोस्ट करत असलेल्या गोष्टींशी लोक सहमत नसतील तर त्यांनी मला खुशाल अनफॉलो करावे. माझी कोणतीही पोस्ट माझा लैंगिक छळ करण्यासाठी कोणालाही आमंत्रित करीत नाही. हे माझे शरीर आहे माझे जीवन आहे. मला त्याबरोबर काय करायचे आहे ते मी ठरवेल. दरम्यान, आलिया कश्यप अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये राहते. इन्स्टाग्रामवर तिचे 2 लाख 9 हजार फॉलोअर्स आहेत.