इनरवियरमध्ये PICS शेयर केल्यानंतर ट्रोल झाली होती अनुराग कश्यपची मुलगी, रडत-रडत Video मध्ये सांगितले दु:ख

नवी दिल्ली : बॉलीवुडचे प्रसिद्ध फिल्म डायरेक्टर अनुराग कश्यप यांची मुलगी आलिया कश्यपने खुलासा केला की, तिला इनरवियरमध्ये स्वत:ची छायाचित्रे शेयर केल्यामुळे ज्याप्रकारे सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते, त्यामुळे ती खुप अस्वस्थ होती. तिने म्हटले की, छायाचित्रे शेयर केल्यानंतर सोशल मीडियावर काही ट्रोलर्सने तिला वेश्या म्हटले, सोबतच रेपची सुद्धा धमकी दिली.

आपल्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट करत आलियाने म्हटले, सोशल मीडिया नकारात्मकतेची एक अशी वस्तू आहे जिच्याबाबत मला माहिती आहे. जसे मी एक खुप संवेदनशील व्यक्ती आहे आणि इतके की एखादा छोटा द्वेषसुद्धा मला प्रभावित करतो, पण मला माहित नाही. मी संवेदनशील आहे, मी जवळपास प्रत्येक दिवशी याबाबत विचार करून रडते.

आपली इनरवीयरमध्ये छायाचित्रे शेयर केल्यानंतर मिळालेल्या द्वेषाबाबत सांगताना आलिया म्हणते, लोक मला म्हणत होते की, मला भारतीय असल्याबाबत लाज वाटायला हवी. लोक मला बलात्काराची धमकी देत होते, मला वेश्या म्हणत होते, मला विचारत होते की, माझा रेट काय आहे, मला आणि माझ्या कुटुंबासाठी धोका आहे.

 

 

 

आलिया कश्यप सोशल नेटवर्किंग साइट इंस्टाग्रामवर खुप अ‍ॅक्टिव्ह असते आणि नेहमी आपली लेटेस्ट छायाचित्रे शेयर करत असते. आलियाला इंस्टाग्रामवर 2 लाखांपेक्षा जास्त लोक फॉलो करतात.