Anurag Kashyap | ‘सेक्रेड गेम्स 3’ येणार नाही; अनुराग कश्यप यांचे मोठे वक्तव्य

पोलीसनामा ऑनलाईन : Anurag Kashyap | बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची ‘सेक्रेड गेम्स’ हि वेबसेरीज चांगलीच गाजली .अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने आणि नीरज घायवान यांनी मिळून या वेबसीरिजची निर्मिती केली होती. यातील शिवीगाळ आणि काही बोल्ड सीन्समुळे ही वेबसीरिज चांगलीच चर्चेत आली होती. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजचा पहिला सीझन प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला, या सीरिजच्या दुसऱ्या सीझनला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हापासूनच याच्या तिसऱ्या सीझनबद्दल चर्चा सुरू आहे. नुकतंच “मॅशेबल इंडिया” यांच्या ‘द बॉंबे जर्नी’ या मुलाखतीमध्ये अनुरागने ‘सेक्रेड गेम्स 3’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही हे स्पष्ट केलं आहे. (Anurag Kashyap)

याबद्दल बोलताना अनुराग कश्यप म्हणाले कि सेक्रेड गेम्स प्रेक्षकांसमोर येणार होता पण नेटाफिल्क्सनेच तो बंद केला. सेक्रेड गेम्स 3 प्रेक्षकांसमोर आणण्याएवढी हिंमत आता नेटफ्लिक्समध्ये राहिलेली नाही, कारण तांडव या वेबसेरीजमुळे जे वाद निर्माण झालेत त्यामुळे बरेच ओटीटी प्लॅटफॉर्म हे घाबरले आहेत. (Anurag Kashyap)

‘तांडव’ या वेबसीरिजमधील एका सीनमुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता.
त्या वेबसेरीजच्या निर्मात्यावर त्यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप ठेवण्यात आला होता त्यामुळेच कदाचित सेक्रेड गेम्स 3 प्रेक्षकांसमोर आणण्याएवढी हिंमत आता नेटफ्लिक्समध्ये राहिलेली नाही. त्यामुळे सेक्रेड गेम्सच्या चाहत्यांसाठी ही निराशाजनक बातमी आहे. अनुराग कश्यप यांचा ‘ऑल्मोस्ट प्यार विथ डिजे मोहब्बत’ हा चित्रपट ३ फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.अलाया एफ,करण मेहता यासारखे कलाकार यात दिसणार आहे .

Web Title :-  Anurag Kashyap | netflix do not have guts to present sacred games season 3 says director anurag kashyap

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra MLC Election Results | ‘सत्यजीत तांबे जिंकले तरीही तो भाजपचा विजय नसेल…;’ – जयंत पाटील

Pune Crime News | ‘आरोपी पकडा अन् बक्षीस मिळवा’, कोयता गँगच्या दहशतीमुळे पुणे पोलिसांची अनोखी योजना

Maharashtra MLC Election Results | सत्यजीत तांबे भाजपमध्ये जाणार नाहीत…; मंत्री दीपक केसरकरांनी सांगितले कारण