20 लाख कोटीच्या पॅकेजबाबत अनुराग ठाकुर यांचे मोठे वक्तव्य, गरज भासल्यास आणखी मदत देईल मोदी सरकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, पहिल्या टप्प्यात गरीबांसाठी पॅकेज देण्यात आले आहे. सध्या सरकार नव्या सूचनांवर काम करत आहे. सरकार राज्यांना सुद्धा शक्य तेवढी मदत देत आहे. देशाकडे पुरेसा परकिय चलन साठा आहे. अशा वेळी जीव आणि जग वाचविण्याची गरज आहे. हॉस्पिटॅलिटी सेक्टरवर कोरोनाचा खुप वाईट परिणाम झाला आहे. 20 लाख कोटीचे हे मदत पॅकेज अंतिम नाही. बाजारातूप आणखी 4.2 लाख करोड रूपये घेऊ. रिफॉर्मचा हेतू परदेशी गुंतवणूक वाढविणे हा सुद्धा आहे. 3 लाख करोड रूपये एमएसएमईएस सोबतच छोट्या व्यवसायांसाठी सुद्धा आहेत.

हे मदत पॅकेज अंतिम नहीं

अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर म्हणाले, गरज पडल्यास एका आणखी मदत पॅकेजची घोषणा होऊ शकते. 20 लाख करोडचे पॅकेज अंतिम नाही.

ते म्हणाले, एमएसएमईला सहज कर्ज उपलब्ध करण्याची मोहिम सुरू झाली आहे आणि निर्गुंतवणुकीच्या प्रकरणांवरही सरकारचे लक्ष आहे, परंतु योग्य किंमत मिळाल्यानंतरच निर्गुंतवणुक केली जाईल. अनुराग ठाकुर यांच्या बोलण्यातील मुख्य मुद्दा हा आहे की, मदत देण्याच्या बाबतीत सरकारकडील पर्याय अजूनही शिल्लक आहेत. सरकारने स्पष्ट केले की मदत पॅकेज देण्याचा अर्थ हा नाही की, त्यांचे काम संपले आहे.

एमएसएमईला सहज कर्ज पुरवठा होत आहे

एमएसएमईवर बोलताना अनुराग ठाकुर म्हणाले, त्यांना सहज कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. ज्यामध्ये कोणतीही गॅरंटीची गरज नाही. भारताने कोरोनाशी लढण्यासाठी चांगली पावले उचलली आहेत. इकोनॉमीसाठी सुद्धा विचारपूर्वक निर्णय घेतले आहेत. कर्जासाठी कोणतीही गॅरंटी द्यावी लागणार नाही. कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सुद्धा सहा महिन्याची मुदत देण्यात आली आहे.

राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी हेदेखील म्हटले की, कोरोनामुळे निर्गुंतवणुक प्रक्रिया मंदावली आहे. परंतु, ती सुरू आहे आणि योग्य किंमत मिळाल्यावर भाग विकले जाईल.