‘क्वारंटाईन’मध्ये ‘अनुष्का’नं किचनमधील कात्रीनं कापले पती ‘विराट’चे केस ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :लॉकडाऊनमुळं सध्या देशभरातील लोक घरातच वेळ घालवताना दिसत आहेत. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मादेखील घरातच आहेत आणि दोघंही एकत्र टाईम स्पेंड करताना दिसत आहेत. दोघंही चाहत्यांना अपील करत आहेत की कोणत्याही परिस्थिती घराच्या बाहेर पडू नका. अशातच अनुष्का शर्मानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. हे पाहून आपण अंदाज लावू शकतो की, दोघं सोशल डिस्टंसला किती महत्त्व देत आहेत. व्हिडीओ खूप मजेदार आहे ज्यात अनुष्का शर्मा विराट कोहलीचा हेअर कट करताना दिसत आहे.

अनुष्कानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ती विराटचे केस कापताना दिसत आहे. अनुष्का आणि विराट सध्या क्वारंटाईनमध्ये क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहेत. किचनमधील कात्रीनं ती विराटचे केस कापताना दिसत आहे. अनुष्कानं केलेला हेअर कट विराटला देखील आवडला आहे.

सध्या विरूष्काचा हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. चाहत्यांनादेखील हा व्हिडीओ खूप आवडला आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. अवघ्या 2 तासात या व्हिडीओला 1.5 मिलियन्स व्ह्युज मिळाले आहेत. अनुष्का आणि विराटच्या हजारो चाहत्यांनी व्हिडीओवर कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.