अभिनेता करण कुंद्रासोबतच्या ब्रेकअपवर पहिल्यांदाच बोलली अनुषा दांडेकर ! म्हणाली…

पोलिसनामा ऑनलाइन –एमटीव्ही व्हिजे अनुषा दांडेकर आणि अ‍ॅक्टर करण कुंद्रा सध्या आपल्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळं चर्चेत आहेत. त्यांच्या ब्रेकअपबद्दल अनेक बातम्या समोर येताना दिसत आहेत.खूप बातम्या समोर आल्यानंतर आता अनुषानं या सगळ्यावर जबरदस्त रिअॅक्शन दिली आहे. तिनं एक पोस्ट शेअर आपल्या भावना मांडल्या आहेत.

आपल्या पोस्टमध्ये अनुषा म्हणते, “मी आता हे एकून ऐकून वैतागले आहे. माझ्या गप्प बसण्याला माझी कमजोरी समजू नका. मला माहिती आहे की, गोष्ट मीडियापर्यंत कोणी नेली आहे.”

अनुषा आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणते, “मला याचं आश्चर्य वाटतं की, इथं कोरोनामुळं अख्ख जग परेशा आणि अशात तुम्ही एखाद्याच्या पर्सनल लाईफची खिल्ली उडवत आहात. तुम्ही फक्त तुमचा विचार करता. मला वाटतं तुम्हाला इतरही कामं असावी. आशा करते तुम्ही शांती शोधाल.”

करण कुंद्रासोबतच्या ब्रेकअपवर लिहिताना अनुषा म्हणाली, “करण आणि माझ्यात सारं काही आलबेल आहे. मीडियात ज्या प्रकारे बातम्या येत आहेत असं काहीही झालेलं नाही.” असंही तिनं स्पष्ट केलं. करण आणि अनुषा यांनी मिळून एक रिअ‍ॅलिटी शो देखील होस्ट केला आहे. याचं नाव आहे लव स्कुल.

https://www.instagram.com/p/B8ojFWzhyBk/

https://www.instagram.com/p/B8jcSFGhuoN/

https://www.instagram.com/p/B8i1OSlByke/

https://www.instagram.com/p/B8hG24rBpKZ/

https://www.instagram.com/p/B8hG24rBpKZ/

https://www.instagram.com/p/B8a9x_yhNNd/