अनुष्का शर्माची ‘Doppelganger’ ‘जुलिया मायकल्स पुन्हा एकदा चर्चेत ! चाहते म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा सारखी दिसणारी अमेरिकन सिंगर जुलिया मायकल्स पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याला कारणही तसेच आहे. अलीकडेच जुलियानं एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊसचा पाडला आहे. तिच्या चाहत्यांनी आणि काही नेटकऱ्यांनी तिला पाहून बॉलिवूड स्टार अनुष्का शर्माची आठवण झाल्याचं सांगितलं आहे.

https://www.instagram.com/p/B8rbxFVh9HI/

जुलियानं मिरर सेल्फी शेअर केला आहे. यात तिनं केसही बांधले आहेत. फोटो शेअर करताना जुलिया म्हणते, “मी जास्त करून माजे केस विंचरत नाही. परंतु मी अनेक गाण्यांवर काम करत आहे. माझ्या गाण्यांसाठी मी खूप उत्साहित आहे.”

हा फोटो पाहिल्यावर अनकेजण चकित झाले आहेत. त्यांना अनुष्का शर्माची आठवण झाली आहे. काही लोक तर तिला पाहून चकित झाले आहेत. एका युजरनं म्हटलं की, मला वाटलं ही अनुष्का आहे. आणखी एकजण म्हणाला, “ओह माय गॉड. ही अनुष्कासारखीच दिसते.”

गेल्या वर्षी जुलियानं अनुष्कासोबत आपला फोटो कोलाज करत हा फोटो सोशलवर शेअर केला होता. तिनं लिहिलं होतं की, “हाय अनुष्का शर्मा. जाहीर आणि कथितपणे आपण जुडवा आहोत. LOL” खास बात अशी की, अनुष्कानंही यावर प्रतिक्रिया दिली होती. अनुष्का म्हणाली, “ओह माय गॉड. मी कधीपासून तुला आणि आपल्या बाकी पाच डॉपलगँगर्सना शोधत होते.”